Breaking News

पनवेल महापालिकेत अत्याधुनिक एरियल लॅडर

पनवेल महापालिकेत अत्याधुनिक एरियल लॅडर

५५ व २८ मीटर अत्याधुनिक एरियल लॅडर खरेदीचा निर्णय

उंच इमारतींमधील आग नियंत्रणासाठी महापालिकेचे मोठे पाऊल

पनवेल (वार्ताहर) - पनवेल शहरात गेल्या काही वर्षांत वेगाने वाढ होत असून, लोकसंख्या, गृहनिर्माण प्रकल्प, व्यापारी संकुले, मॉल्स, रुग्णालये, हॉटेल्स तसेच उद्योगक्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच उंच इमारती, हाई-राईज रेसिडेन्शियल टॉवर्स, कार्यालयीन संकुले मोठ्या प्रमाणावर उभी राहत आहेत. या पार्थभूमीवर आगीच्या घटना व इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेने ५५ मीटर व २८ मीटर उंचीपर्यंत कार्यक्षम अशा अत्याधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहनांची खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या माध्यमातून पनवेल महापालिकेचा अग्निशमन विभाग अधिक सक्षम, आधुनिक आणि सुसज्ञ होणार आहे. सद्यस्थितीत पनवेल महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असलेली साधनसामग्री मर्यादित असून, विशेषतः उंच इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना वाचवायचे असल्यास आवश्यक त्या उंचीपर्यंत पोहोचण्याकरिता आधुनिक एरियल लॅडर प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. यात ५५ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म हे उंच इमारतींमध्ये (१५ ते २० मजले व त्यापेक्षा जास्त) पोहोचण्यासाठी उपयोगी ठरेल, तर २८ मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म मध्यम उंचीच्या इमारती, गृहनिर्माण संकुले, रुग्णालये, शाळा, हॉटेल्स आदी ठिकाणी बचावकार्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या खरेदी प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आल्या असून, तांत्रिक निकषांनुसार पात्र कंपन्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. आवश्यक तांत्रिक वैशिष्ट्ये, सुरक्षितता मानके, कार्यक्षमता व दीर्घकालीन देखभाल खर्च यांची सखोल तपासणी करून योग्य तो प्रस्ताव निवडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे २२ कोटींहून अधिक खर्च (जीएसटीसह) येणार असून, ही गुंतवणूक शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनपा प्रशासन सज

महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्या व उंच इमारतींशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ञ राहील.


- मंगेश चितळे, आयुक्त तथा प्रशासक, पनवेल महापालिका


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...