Breaking News

जुईनगर येथे अनधिकृत आठवडे बाजारावर महापालिकेची धडक कारवाई

जुईनगर येथे अनधिकृत आठवडे बाजारावर महापालिकेची धडक कारवाई

तुर्भे (प्रतिनिधी)- जुईनगर येथे अनधिकृतपणे भरणाऱ्या आठवडे बाजारावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून शहरातील बेवारस वाहने आणि अनधिकृत फेरीवाले यांच्या विरोधात कारवाईची धडक मोहीम महापालिकेने हाती घेण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांनी दिली. प्रभागातील नागरिकांना दैनंदिन साहित्य उपलब्ध उपलब्ध व्हावे यासाठी दैनंदिन मार्केट बांधण्यात आले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ही दैनंदिन मार्केट उभारण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक प्रभागात लाखो रुपये खर्च करून किमान एक ते तीन मार्केट बांधण्यात आले आहे. या मार्केटमध्ये शहरातील नोंदीत अधिकृत २ हजारहून अधिक फेरीवाले बसवण्यात आले आहेत. असे असतांनाही गेल्या काही वर्षांपासून शहरांमध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये २ ते 3 बेकायदेशीर आठवडी बाजार भरवले जात आहेत. यामध्ये सुमारे २०० ते २५० इतकी फेरीवाल्यांची संख्या असते. तसेच त्यांच्याकडून प्रत्येकी २0०० ते ३00 रुपये ४ तासांकरिता घेतले जातात. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या मैदानांमध्ये आणि काही ठिकाणी थेट रस्त्यांवर अतिक्रमण करून हे बाजार भरवले जातात. यामध्ये बाहेरच्या फेरीवाल्यांचा भरणा असतो. प्रत्येक प्रभागांमध्ये काही राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी यांच्या सहकार्याने हे बाजार भरवले जातात. यामध्ये जमा होणारी रक्कम विभाग कार्यालयातील कर्मचारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि बाजार भरवणारे गावगुंड हे वाटून घेतात. यामुळे याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही विभाग कार्यालयापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत डोळेझाक केली जात होती. तसेच एखाद्या वेळेस कारवाई केली, तर ती थातूर मातुर कारवाई केली जात होती. अखेर याप्रकरणी वारंवार तक्रारी येत असल्याने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपायुक्त कैलास गायकवाड यांना आठवडे बाजार भरत असल्याची माहिती मिळताच त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभाग कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत आठवडी बाजार बंद करून संबंधितांचे साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


Most Popular News of this Week