Breaking News

गुटखाबंदी नावापुरतीच : नवी मुंबईत खुलेआम होतेय गुटखा विक्री

गुटखाबंदी नावापुरतीच : नवी मुंबईत खुलेआम होतेय गुटखा विक्री

नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाने काही वर्षापूर्वी गुटख्यावर बंदी घातली आहे. मात्र असे असले तरी राज्यभर खुलेआमपणे गुटखा विक्री होतांना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईसह इतर विविध भागात या कायद्याची संबंधित यंत्रणांकडून पाहिजे त्या प्रमाणात अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने आजमितीस नवी मुंबईसह इतर विविध भागात पान टपऱ्या व इतर विविध ठिकाणी खुलेआमपणे गुटख्याची विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे.  साधारणपणे वर्ष २०१२ पासून सरकारने राज्यात गुटखाबंदी केली. मात्र त्यानंतर अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यंत्रणांच्या अपयशामुळे, शहरातील आणि ग्रामीण भागातील पानटपऱ्यांवर सर्रासपणे गुटखा मिळत असल्याचे दिसून येते. कायद्याचा धाक नसल्याने, गुटखा विक्रेते आणि उत्पादक यांच्यावर कठोर कारवाई होत नाही, ज्यामुळे ही बंदी केवळ कागदावरच व नावापुरतीच असल्याच्या प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे.

साधारणपणे वर्ष २०१२ मध्ये राज्यात लागू झालेली गुटखा बंदी कागदावरच आहे, कारण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन(एफडीए) या यंत्रणांच्या निष्क्रियतेमुळे आजमितीस गुटख्याची विक्री पानटपर्‍यांवर खुलेआमपणे सुरू आहे. विशेष म्हणजे गुटख्याची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यात यंत्रणांना अपयश आले आहे. त्यात कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद असूनही, विक्रेत्यांवर कठोर कारवाई होतांना दिसत नाही. विशेष म्हणजे काही ठिकाणी गुटख्याचे बेकायदेशीर कारखाने सुरू असल्याचे समोर आले आहे, जिथे मोठ्या प्रमाणात गुटखा तयार केला जातो. त्यामुळे, गुटखा बंदी ही केवळ सरकारी आदेशापुरती मर्यादित राहिली आहे, असे चित्र आहे.

एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात खुलेआमपणे सुंगधी मिश्रीत तंबाखू व गुटख्याची विक्री पानटपऱ्यांवर होत आहे. विशेषकरून नवी मुंबईतील पनवेल व तळोजा भागात तर किराणा दुकानांमधून गुटखा विक्री झाल्याचे यापूर्वी झालेल्या कारवाईतून समोर आलेले आहे. खाडी किनारी मार्गातून प्रामुख्याने हा गुटखा आणला जात असल्याचे बोलले जाते. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर हे गुजरात जवळ असल्यामुळे या राज्यातून हा गुटखा आणला जात आहे. गुजरात सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असुनही गुटख्याची वाहतूक होतांना दिसते. गुटखा वाहनाद्वारे येत असताना पोलिस यंत्रणा काय करते असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गुटखा बंदी आल्यानंतर अनेकांनी तंबाखू मिश्रित मावा विक्री सुरू केली होतो. सुरुवातीला त्या माव्याच्या आडून चोरून गुटख्याची विक्री केली जात होती. गुटखा विक्री करण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यापाऱ्यांची मोठी साखळी काम करत आहे. यामध्ये पोलीस व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांचेही या साखळीला मूक समर्थन असते व त्याचाच परिणाम म्हणून विविध ठिकाणी हा गोरखधंदा फोफावला असल्याचे दिसून येते. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर, वसई विरारमध्ये काही ठिकाणी परराज्यातून आलेला गुटखा ठेवण्यासाठी गोदाम आहेत. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गुटखा आणून पहाटे छोट्या छोट्या व्यापाऱ्याला दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. व त्यानंतर हे व्यापारी विविध मार्गाने पान टपऱ्यांवर गुटखा वितरित करतात. या गुटख्यातून दररोज करोडोची उलाढाल होत आहे. परंतु कारवाई मात्र होताना दिसत नाही.

दरम्यान, यापूर्वी पोलिस व एफडीए यांच्या संयुक्त पथकांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईतून ट्रक व टेम्पो भरून गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. ट्रक व टेम्पोमधून गुटखा हस्तगत केल्यानंतर सदरचे वाहनही यंत्रणांकडून जप्त केले जाते. त्यामुळे या प्रकारातून होणारे नूकसान व कारवाई टाळण्यासाठी विक्रेत्यांकडून अलिकडच्या काळात स्कुटी व दुचाकीवरून मोठ्या पिशव्यांमधून गुटख्याची वाहतूक करण्याचे प्रकार घडले असल्याचे यंत्रणांच्या कारवाईतून समोर आले आहे.



Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...