घोडबंदररोडवरील प्रकल्प कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
घोडबंदररोडवरील प्रकल्प कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
घोडबंदररोडवरील प्रकल्प कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकल्पअंतिम टप्प्यात असून या विकासकामांचे लोकार्पण, वाघबीळ येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन नाट्यगृहाचे भूमिपूजन महापालिका निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने अंतिम टप्प्यातील प्रकल्प १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावेत तसेच घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण आदी कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल झालेल्या बैठकीत दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक काल शुक्रवार दि. ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै.अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त (वाहतुक) पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, एमणए्मआरडीए, मेत्रे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्मशानभूमींचे अत्याधुनिक पध्दतीने सुशोभिकरण, पाळीव प्राण्यासाठी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे डिजीटल क्लेरियम तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांसाठी प्रत्येक ठिकाणी जॉगिग ट्रॅक तयार करण्यात येत असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. घोडबंदर रोडवर सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू आहे, एमएमआरडी, विद्युतविभाग, पाणी विभाग, मेठ्रे प्रधिकरण आणि वाहतूक पोलीस यांचा समन्वय साधून सेवा रस्ता जोडणीचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. घोडबंदररोडवरील वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होवू नये तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे पाच स्कॉड वाहतूक पोलीसांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ठाणे शहरातील ९६ टन ओला कचऱ्याचे गायमुख येथील प्रकल्पाच्या माध्यमातून खत तयार केले जात असून हा राज्यातील पहिला खतनिर्मितीचा प्रकल्प असल्याचे सांगत कचरा प्रश्न सोडविण्यासाठी सोलर डस्ट ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातील वर्तकनगर, नागलाबंदर खाडी किनारा सुशोभिकरण व मंग्रोव्ह उद्यानांची सद्यस्थिती, उपवन येथील धर्मवीर आनंद दिघे जिमखाना, आप्पासाहेब धर्माधिकारी भवन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण इमारत व सुधाकर चव्हाण बहुउद्देशिय इमारत आदी प्रकल्पांचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. घोडबंदर रोडवर विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेली कामे अतिशय उत्कृष्ट पध्दतीने सुरू असून याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथे सर्वसामान्य ठाणेकरांसाठी तिसरे नाट्यगृहाची निर्मिती होत आहे. राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहानंतर वाघबीळ येथील ७ हजार ३५० स्क्रे.मीटर जागेवर अतिशय भव्य असे नाट्यगृह नागरिकांना उपलब्ध होणार आहे. याचा फायदा निश्चितच घोडबंदर येथील नागरिकांना होणार आहे. अद्ययावत अशा या नाटयगृहाचे भूमीपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील विकासकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला असून, या निधीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाणे शहरातील एकूण ६७ विहिरींचे शास्त्रोक्त पध्दतीने पुनरुज्ञीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला असल्याने या विहीरींचे पाणी पिण्यासाठी वापरता येणार आहे.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
