नवी मुंबईत भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी सार्वजनिक हेल्पलाईन सुरु
नवी मुंबईत भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी सार्वजनिक हेल्पलाईन सुरु
नवी मुंबई (प्रतिनिधी) - भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि पारदर्शक शासन व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने अन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई कार्यालयामार्फत नुकतीच नवी मुंबई परिसरातील नागरीकांसाठी विशेष सार्वजनिक हेल्पलाईन कमांकाचे उदघाटन करण्यात आले. हेल्पलाईन कमांक ९९२०३५१०६४ असा आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अधिती म्हणुन अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांनी उपस्थित राहुन हेल्पलाईन क्रमांकाचे लोकार्पण केले. या सोहळयाला अन्टी करप्शन ब्युरो नवी मुंबई कार्यालयाचे पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके, पोलिस निरीक्षक सुधीर निकम, पोलिस निरीक्षक किरणकुमार वाघ, पोलिस निरीक्षक अरूधती येळवे आदी उपस्थित होते. नवी मुंबईत राहणाऱ्या नागरीकांना शासकीय कार्यालय, कंत्राटी प्रक्रिया किंवा कोणत्याही सरकारी कामात लाच मागितल्यास किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरीत तकार नोंदविण्यासाठी हा हेल्पलाईन कमांक उपलब्ध करण्यात आला आहे. या कार्यकमादरम्यान प्रमुख अति्थींनी नागरीकांना अहवाल केले की, भ्रष्टाचार विरूध्द लढा ही फक्त सरकारी यंत्रणेची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरीकाची सामुहिक जबाबदारी आहे. जागरूक नागरीक हे प्रामाणिक शासनाचे सर्वात मोठे बळ आहे. नवी मुंबई परिसरातील नागरीकांनी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुध्द भ्रष्टाचारासंबंधी तकारी असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई येथे टोल फ्री क्रमांक कृ. १०६४ व दुरध्वनी क्रमांक ०२२ - २७८३३३४४ यावर तसेच व्हॉटस्अप कमांक ९९२०३५१०६४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईचे पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांनी केले आहे.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
