दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...नवी मुंबईत श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...नवी मुंबईत श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी
नवी मुंबई (प्रतिनिधी)- दत्त जयंती हा हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमिला साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. नवी मुंबईत श्रीदत्त जयंती उत्सव काल मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्त शहराच्या विविध भागातील दत्त मंदिरपरिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दत्तजयंतीनिमित्त दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंराच्या गजराने मंदिर परिसर दुमदूमला होता. दत्त जयंतीनिमित्त शहरातील दत्त मंदिर परिसरात लाउड स्पिकरवर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. दत्ता दिगंबराया... स्वामी मला भेट द्या हो...दत्त दिगंबर दैवत माझे... अशा प्रकारे श्रीदत्तगुरूंचा महिमा वर्णन करणारी गीते ऐकावयास मिळत होती. नवी मुंबई शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रम आणि भजने आयोजित केली होती. सानपाडा येथील देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीदत्त उपासक स्व. नारायण गोविंद पाटील यांच्या संकल्पनेतून व श्रीदत्त उपासक स्व.प्रभाकर नारायण पाटील यांच्या पुढाकारातून श्रीदत्त मंदिर, श्रीलक्ष्मी नारायण भवन रबाळेगाव कोळीवाडा येथे श्रीदत्त जन्मोत्सवाचे यंदाचे हे ३६ वे वर्ष आहे. श्रीदत्त जयंतीनिमित्त यंदा रौप्य महोत्सवी वर्षात भजन सप्ताह सोहळा पार पडला. यानिमित्ताने हरिनामाने परिसर दुमदुमला होता. दत्तजयंतीनिमित्त श्रीगुरुचरित्र अध्याय पारायण, आरती,रात्री ८ ते १० यावेळेत भजन, श्रीसत्य नारायण पुजा तसेच दत्तजयंतीनिमित्त गुरूवारी सांयकाळी जन्मोत्सव सोहळा, गुरुचरित्र पारायण आध्याय १४ वा श्री नारायणो पनिषद, रात्री ८ ते १० माधुरी भंडारा, रात्री ८ ते १० यावेळेत सिंधुदुर्ग लोककला प्रतिष्ठान भजन मंडळ रबाळेगाव यांचे भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. या जन्मोत्सव सोहळयासाठी समस्त ग्रामस्थ मंडळ रबाळे व इतर विविध मंडळ तसेच तरूणाईने विशेष सेवा दिली. यावेळी मंदीर परीसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी होती. दत्त मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला होता. दत्तजयंतीनिमित्त शहरातील इतर विविध परिसरात असलेल्या दत्त मंदिर परिसरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
