डेब्रीज टाकणाऱ्या डपर्सवर सिडकोची कारवाई पाच डपर्स जप्त; चालकांबिरोधात पोलिसांत गुन्हा
डेब्रीज टाकणाऱ्या डपर्सवर सिडकोची कारवाई पाच डपर्स जप्त; चालकांबिरोधात पोलिसांत गुन्हा
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्या डंपरबरोबर त्यांच्या चालकांना रंगेहाथ पकटून या प्रकारांना आळा घालण्यासाठी सिडको प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यानुसार सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि.3 डिसेंबर रोजी चिरनेर गव्हाणफाटा रोडवरील एम्पेझर यार्ड जांभूळपाडा येथे सिडकोच्या कार्यक्षेत्रात डेब्रीज खाली करणाऱ्या पाच डंपर्सवर कारवाई करून ते जप्त करण्यासह चालकांविरोधात उरण पोलिस ठण्यात गुन्हा दाखल केला आहे. अनधिकृत डेब्रोजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस विभाग आदींचे पथक दि. ०३/१२/२०२५ रोजी सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असताना संध्याकाळी १७:१५ वाजताचे सुमारास डंपर (एमएच-०१- डीआर ८३४५) वरील चालक सुरेश केरबा कदम, (४७) रा. शिवंडी मुंबई ,डम्पर क्रेंएमएच-0३-इएस-२१९९ वरील चालक अमरसिंह लथयलाल गौतम, (२७) रा. मु. अरई, ता.चायल. जि. कोसंबी. उत्तरप्रदेश, डम्पर क्र एमएच-०३-इएस-२३९९ वरील चालक कमलेश नंदलाल प्रजापती, रा. आंबापाडा झोपडपट्टी माहुलगांव चेंबुर, डम्पर क्रेएमएच-03३-ईएस-०२९९ वरील चालक अरविंट्कुमार धसिटे गौतम, (३१), रा. मु. सरायकोल, ता. चायल जि. कोसंबी उत्तरप्रदेश व डम्पर क्रं एमएच-०३- ईएस-२४९९ वरील चालक शिबभोले फुलचंद पुष्पकर,(3१), रा. मु. काजो. पो. काजु, तायल, जि. कोसंबी, उत्तरप्रदेश हे उपरोक्त पाच डंपर चालक हे त्यांच्या ताब्यातील डंपरमधून मानवी जीवितास/लोकांच्या आरोग्यास हानीकारक असलेले डेब्रीज/माती अनधिकृतपणे आणून चिरनेर गव्हाणफाटा रोडवरील एप्पेझर यार्ड जांभुळपाडा ता. उरण येथे बेकायदेशीर पध्दतीने टाकून सिडकोच्या अधिसुचित क्षेत्रातील जागेचे विद्रपोकरण करण्यास बेजबाबदार कृत्य करताना मिळून आले. उपरोक्त पाचही डंपर चालकांविरुध्द उरण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ चे कलम २८०, ३ (५), सह महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२० प्रमाणे दि 03 डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करून सर्व पाचही डम्पर जप्त केले आहेत.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
