Breaking News

सखोल स्वच्छता मोहिमेतुन वायू प्रटूषण नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेचा भर

सखोल स्वच्छता मोहिमेतुन वायू प्रटूषण नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेचा भर

आठवड्यात ८६ बांधकाम साईट्सची पाहणी

मानक कार्यप्रणालीचे पालनासाठी विकासकांना बजावल्या नोटीसा

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सध्या हिवाळ्यात सर्व शहरांमधील वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली दिसत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबविण्यास आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार मागील आठवडयापासूनच सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा दिसून येत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. वायू प्रटूषण नियंत्रणावर प्रभावी उपाययोजना करतांना विकास कामातून होणाऱ्या धूळीवर नियंत्रणाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. याकरिता विभागनिहाय पथके स्थापन केली असून त्यामध्ये विभागातील अभियंते, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असून ही पथके विभागात सुरू असलेल्या बांधकाम साईट्स, दगडखाण क्षेत्र, सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्रकल्प अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करीत आहेत. त्यानुसार नगररचना विभागाच्या अभियंत्यांसह पथकांनी या आठवड्यात ८६ बांधकाम साईट्सवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून त्याठिकाणी मानक कार्यप्रणालीचे पालन करणेबाबत नोटीस बजावलेल्या आहेत. याबाबत पुन्हा पाहणी करुन त्रूटी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसेच आठवडाभरासाठी ते काम बंद केले जाणार आहे. (या सोबतच बांधकाम साईट व परिसराची स्वच्छता राखणे वायू प्रटूषण नियंत्रणासाठी महत्वाचे असून तशा प्रकारच्या सखोल स्वच्छता मोहीमा घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत हाती घेण्यात आल्या आहेत.

आजही अशाप्रकारची सखोल स्व्वछता मोहीम तुर्भ एमआयडीसी येथील गुडविल कंस्ट्रकशनच्या साईटवर राबविण्यात आलेली असून त्याठिकाणी ब्रश झाडूने परिसर व रस्ते झाडून त्या ठिकाणची माती संकलीत करण्यात आली. अशाचप्रकारे मुख्य रस्त्यांवरील वाहनांची सातत्याने होणारी वर्दळ व त्यामुळे होणारे वायू प्रदूषण आणि रस्त्याच्या कडेला जमा होणारी माती व धूळ साफ करण्यासाठी युध्द पातळीवर सखोल स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.


Most Popular News of this Week