सानपाड्यातील शिंदेसेनेचे पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेत
नवी मुंबई (प्रतिनिधी) - निवडणूकांच्या निमित्ताने सध्या सर्वत्र विविध पक्षांमध्ये इतर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आपपल्या पक्षात आणण्याची जणू स्पर्धा सुरु झाली आहे. तसेच विविध पक्षात नाराज असलेले पदाधिकारी हे इतर पक्षांचे दरवाजे ठोठावतांना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटातील सानपाडा येथील सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनी काल मातोश्री येथे जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संबोधित करताना म्हणाले की, अनेक कार्यकर्ते काही गैरसमजाने पक्ष सोडून गेले. मात्र तेथे त्यांचा भ्रमनिरास झाल्याने ते पुन्हा स्वगृही परतत आहेत ही चांगली बाब आहे. आज भाजप अनेक गोष्टीची नावे बदलत आहे. त्याचबरोबर आपल्याच मतदारांच्या मोबाईलमध्ये संचार अँप अपलोड करून त्यांची हेरगिरी करू पाहत आहे असा सवाल उपस्थित करून ही अतिशय निंदनीय बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, राजन विचारे, उपनेते व निरीक्षक भाऊ कोरगावकर, संपर्क प्रमुख एम के मढवी, जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी, उप जिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, सुनील गव्हाणे, शत्रुघ्न पाटील, शहर प्रमुख विशाल ससाणे, कार्यालय प्रमुख एकनाथ टुखंडे, उपशहर प्रमुख अजय पवार व इतर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
