Breaking News

सानपाडा-मोराज चौकातील वाहतूक कोंडी फुटणार... पामबीच मार्गावर होणार भुयारी मार्ग!

सानपाडा-मोराज चौकातील वाहतूक कोंडी फुटणार... पामबीच मार्गावर होणार भुयारी मार्ग!

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील सानपाडा पामबीच मधील से-१९ येथील केसर सॉलीटेअर येथून पामबीच मार्गाखालून वाहनचलित भुयारी मार्गाच्या निर्मितीला हायकोर्टाची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सानपाडा येथे होणारी वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे. यासंदर्भात सानपाडा विभागातील स्थानिक माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत व रुपाली भगत यांनी महापालिकेकडे वनविभागाकडे सातत्याने आपली मागणी लावून धरत पाठपुरावा केला होता. अखेरीस त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे.

भुयारी मार्गाचा हा प्रकल्प सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने बांधकामासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असून नवी मुंबई महापालिकेने परवानगी मिळावी म्हणून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. प्रकल्पासाठी कोणतेही कांदळवन तोडण्यात येणार नाहीत तसेच सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होणार नसल्याचे न्यायालयाने नमूदकरत ०0२ वर्षांपूर्वी टेंडर झालेल्या या भुयारी मार्गाच्या प्रकल्पाला परवानगी दिली व सदर याचिका निकाली काढली. तसेच याकामी  सानपाडा विभागातील स्थानिक माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत व रुपाली भगत यांनी महापालिकेकडे वनविभागाकडे सातत्याने आपली मागणी लावून धरली होती. अखेरीस न्यायालायात जनहिताच्या बाजूने लागलेल्या या निर्णयामुळे दोन्हीही माजी नगरसेविकांनी उच्च न्यायालयासह राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे विशेष आभार मानले आहेत, सोबतच याकामी जलद कार्यवाही करणारे नवी महापालिका आयुक्त यांच्यासह जनतेने दिलेल्या भक्कम पाठिंब्या बद्दल आभारी आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे आता नवी मुंबई महापालिकेस आता वन विभागाच्या हरकतविना येथे भुयारी मार्गाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. पामबीच लगत असलेल्या मोराज सोसायटी समोरील चौकात प्रतिदिन वाहतूक कोंडीतून आता सोनखार - पामबीच विभागातील सेक्टर १, १३ ते १९ सेक्टर्स मधील रहिवासीयांसह संपूर्ण सानपाडा नोड मधील सानपाडा गाव, सेक्टर २ ते से- ११ वासियांना तसेच जुईनगर मधील रहिवासीयांना दैनंदिन वाहतूक कोंडीतुन कायमची मुक्ती मिळणार आहे.


Most Popular News of this Week