भाजपच्या अँड.मंगल घरत यांच्या पाठपुराव्याला यश... नेरुळ येथील आरक्षित भूखंड उद्यानासाठीच राहणार राखीव! आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आश्वासन

भाजपच्या अँड.मंगल घरत यांच्या पाठपुराव्याला यश... नेरुळ येथील आरक्षित भूखंड उद्यानासाठीच राहणार राखीव! आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आश्वासन

नेरूळ (प्रतिनिधी) -नेरूळ से-२८ आणि २२ येथे गार्डनसाठी आरक्षित असलेला भूखंड हा गार्डनसाठी राखीव ठेवण्यात येईल असे आश्वासन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी भाजप कायदा आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अँड.मंगल घरत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिले.

यासंदर्भात से-२८ सिटीझन फोरमच्या एका शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी भाजप कायदा आघाडी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अँड.मंगल घरत यांच्यावतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवी मुंबईत प्रत्येक सेक्टर्ससाठी लहान मुलांसाठी उद्यान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच तरुणांसाठी ओपन जिम आणि जॉगर्स पार्क असणे आवश्यक आहे. मात्र असे असतांनाही सेक्टर २८ येथे लहान मुलांना खेळण्यासाठी अद्याप एकही जागा नाही. त्यामुळे सेक्टर २२, नेरुळ,येथील भूखंड क्र १२ सी आणि १२ डी येथे लहान मुलांना उद्यान तसेच नाना नानी पार्क बनवण्यासाठी सदर भूखंडाची मागणी महापालिकेकडे यापूर्वीच केली आहे. तसेच से- २८ नवीन येथे बहुसंख्या इमारती असूनही तेथील लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीच जागा उपलब्ध नसल्याने या मुलांना ज्वेल ऑफ नवी मुंबई याठिकाणी प्रत्येकवेळी जाणे शक्‍य होत नसल्याची बाबही त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत, सदरठिकाणी उद्यानासाठी राखीव जागेची मागणी लावून धरली होती. त्याप्रमाणे सदरची जागा महापालिकेच्या आराखड्यात दिसतही आहे. मात्र असे असतांनाही एका माजी नगरसेविकेने काही महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून से-२८ आणि २२ येथे गार्डनसाठी आरक्षित असलेला भूखंड पार्किंगसाठी करण्याचे टेंडर काढून कामाला सुरुवात केली होती. सदरची ही बाब अँड. मंगल घरत यांच्या निदर्शनास येताच, काल दि.२ डिसेंबर रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली व सदरची ही गंभीर बाब आयुक्तांसमोर मांडली असता, आयुक्तांनी यावर तातडीने कारवाईचे आश्वासन देत त्वरीत संबंधित विभागाकडे या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच सदरचा भूखंड हा गार्डन साठीच राखीव आहे आणि तशाच पद्धतीने तो राहील असे आश्वासन दिल्याचे मंगल घरत यांनी सांगितले. यावेळी सदर समस्येसंदर्भात आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात मंगल घरत यांच्यासह प्रा. विलास उजगरे, प्रा. वंदना गायकवाड , सागर सरोदे, नेहा उजगरे आणि शिवानी नागर यांचा समावेश होता.

आयुक्तांच्या आश्वासनामुळे डाव फसला

मनपा अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही राजकीय मंडळीने से २८ आणि २२ येथे गार्डनसाठी आरक्षित भूखंड हा पार्किंगसाठी करण्याचे टेंडर काढून कामाला सुरुवात केली होती. मात्र आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांचा हा डाव फसला आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल त्यांचे आभार आहोत.

- अँड. मंगल घरत

जिल्हाध्यक्ष भाजप नवी मुंबई कायदा आघाडी


Most Popular News of this Week

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

११ जणांच्या मृत्यूनंतर...

कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...