नवी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार!
ना. गणेश नाईक यांच्या दाव्याने नवी मुंबईत राजकीय खळबळ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात सत्तेत भागीदार असलेल्या भाजप व शिवसेना (शिंदे) गट या दोन मित्र पक्षांमधील नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यामुळे महापालिका निवडणूकीत महायुती होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतानाच, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी कोपरखैरणे येथे एका कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा केल्याने नवी मुंबईतील राजकारणात विशेषकरून त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. गणेश नाईकांच्या दाव्यामुळे नवी मुंबईत महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. कोपरखैरणे प्रभाग क्रं.१० (सेक्टर-१,४, ५ ते ८) येथील भाजप नगरसेवकांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच नामदार गणेश नाईक यांच्याहस्ते पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना, नामदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईचा महापौर भारतीय जनता पक्षाचा होईल असा पुनरुच्चार करत, नवी मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर भाजपचा दावा केला. ते म्हणाले की, आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. युतीच्या पलिकडे जर महाआघाडीच्या लोकांना जर कोणाचा त्रास असेल तर त्यांनासुध्दा न्याय देण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. कारण लोकशाहीत सर्व दिवस सारखे राहत नाही आणि नवी मुंबईचा महापौर भारतीय जनता पक्षाचा होईल यात दुमत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
