नवी मुंबईत मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय!
६ महिलांची सुटका; महिला मॅनेजरला ४ डिसेंबरपर्यंतची पोलिस कोठडी
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हेशाखेने पर्दाफाश करत, वेश्या व्यवसायातून सहा महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी स्पाची महिला मॅनेजर व तिचा पार्टनर अशा दोघांविरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करून महिला मॅनेजरला अटक करण्यात आली आहे तर तिचा पार्टनर अद्यापी फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे)दीपक साकोरे व गुन्हेशाखेचे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ यांनी पोलीस आयुक्तालय परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी गुप्त बातमीदारामार्फत, “आरपणाच सलुन आणि स्पा” शॉप नंबर 0१, देवीज्योती हॉटेलचे जवळ, जुहूनगर जुहूगाव, से-११, वाशी येथे सहा हजार रूपये घेवुन मसाजच्या नावाने तेथे असलेल्या महिलांकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक घोरपडे यांनी सदरठिकाणी बनावट ग्राहकास पाठवून खातरजमा केली असता, बनावट ग्राहकाच्या सांकेतीक इशाऱ्यावरून पथकाने सदरठिकाणी छापा टाकला असता, तेथे 0६ महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या मिळुन आल्या. स्पाची महिला मॅनेजर असिमा रॉबिन घोष (३४), रा. साईकुंज सोसायटी, से- से-११ वाशी,मुळ रा. कोलकत्ता व तिचा पार्टनर पाहिजे आरोपी नुर आलम शेख, रा. चेंबुर या दोघांनी आपआपसात संगनमत करून 0६ महिलांना बॉडी मसाज करण्याचे नावाने प्राप्त करण्यासह सदर महिलांना वेश्या व्यवसायासाठी बनावट ग्राहकास दाखवून व्यवसायाचा मोबदला म्हणून सहा हजार रूपये स्विकारल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले. याप्रकरणी स्पाची महिला मॅनेजर असिमा रॉबिन घोष हिच्यासह पाहिजे आरोपी नूर आलम शेख अशा दोघांविरोधात वाशी पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम १४३(३), ३(५), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिला मॅनेजर असिमा घोष हिला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला 0४ डिसेंबर २०२५ पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत. गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मपाल बनसोडे, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, एपीआय योगेश देशमुख, महिला पोलिस उपनिरीक्षक सरिता गुडे,पोलिस हवालदार मांडोळे, ठाकर, चव्हाण, पारासुर,चव्हाण, अडकमोल, अनिता भोये , मोहिते आदींच्या पथकाने सदरची ही कामगिरी पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
