Breaking News

केडीएमसी क्षेत्रात वाढले तब्बल एक लाख ७३ हजार ८७४ मतदार

केडीएमसी क्षेत्रात वाढले तब्बल एक लाख ७३ हजार ८७४ मतदार

कल्याण (वार्ताहर) - कल्याण डोंबिवली महापालिकेची यंदाची पालिका निवडणूक मागील दहा वर्षा पूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेने केवळ एक लाख ७३ हजार ८७४ मतदार वाढल्याने वाढीव मतदार संख्या १२.२० टक्के इतकी झाली आहे. या मध्ये वाढलेल्या मतदानात महिला मतदाराची सख्या धक्कादायक असून महिलांची वाढीव मतदार सख्या दहा हजार संख्येचा आकडा गाठू शकला नाही ही बाब चिंतेची आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक पालिका निवडणुकीचा कालावधी नोव्हेंबर २०२० साली संपुष्ठात आल्यानंतर सहावी पालिका पाच वार्षिक पालिका निवडणूका कोरोनाच्या संसर्गमुळे पुढे ढकलण्यात आली व शासनाने पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू केली. अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने तब्बल दहा वर्षाच्या कालावधी नंतर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूका होणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतर पालिकेच्या निवडणूक विभागाने गुरुवारी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीत मागील दहा वर्षा पूर्वी झालेल्या २०१५ सालच्या पालिका निवडणुकीच्या वेळी एकूण लोक सख्या १५ लाख १८ हजार ७६२ होती. यामध्ये पुरुष मतदार ५ लाख ८१ हजार ९१६ तर महिला मतदार ६ लाख ६८ हजार ७३० असे एकूण १२ लाख ५० हजार ६४६ मतदार होते. निवडणुकीत ३ लाख १६ हजार ६३८ पुरुष मतदारांनी तर २ लाख ५४ हजार ८४० महिला मतदार अश्या एकूण ५ लाख ७१ हजार ४६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित ४५.६९ टक्के मतदान झाले होते. मागील दहा वर्षा पूर्वीच्या २०१५ सालच्या निवडणुकीच्या तुलनेने पालिका क्षेत्रातील निवडणुकीसाठी एकूण लोक संख्या १५ लाख १८ हजार ७६३ इतकी असून १४ लाख २४ हजार ५२० एकूण मतदार संख्या आहे. या मध्ये पुरुष मतदार ७ लाख ४५ हजार ३९२ तर महिला मतदार ६ लाख ७८ हजार ५७६ व इतर ५५२ मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, मागील निवडणुकीच्या तुलनेने यंदाच्या निवडणुकीत १ लाख ७३ हजार ८७४ मतदार वाढले असून यामध्ये १ लाख ६३ हजार ४७६ पुरुष तर ९ हजार ३९८ मतदारांची संख्या आहे. या वाढीव मतदार संख्येत मागील निवडणुकी पेक्षा एकूण २१.४३ टक्क्यांनी तर पुरुष मतदारांची १२.२० टक्क्यांनी वाढ झाली तर महिला मतदारांची १.४५ टक्के वाढ झालेली ही नगण्य असून या पालिका निवडणुकीत महिला मतदारांनी अनुत्सुकता दाखवित पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...