Breaking News

बेलापूरमधील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

बेलापूरमधील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहिम सध्या तीव्र करण्यात आली असून काल बेलापूर से-११ येथील अनधिकृत पत्राशेडच्या बांधकामावर कारवाई करून ते हटविण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने बेलापूर से-११ येथील उमेश माळवे, फ्लॅट नं-१०१, प्लॉट नं- ३६, कुकरेजा इस्टेट यांचे अनधिकृत बांधकामास नोटीस बजावण्यात आली होती. मात्र अतिक्रमण विभागाने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे, अतिरिक्त जिल्हा न्यायालय बेलापूर यांचे आदेशानुसार, नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत आयुक्‍त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने बेलापूर विभागातील उपरोक्त ठिकाणचे पत्राशेडचे अनधिकृत बांधकाम हटविले. सदर धडक मोहिमेसाठी अ विभाग कार्यालय अंतर्गत बेलापूर विभागातील, सहा. आयुक्‍त तथा विभाग अधिकारी प्रशांत नेरकर, सहा. अभियंता आत्माराम काळे व विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहिमेसाठी मजूर-७, गॅसकटर-१, इत्यादी मनुष्यबळ व साधनसामुग्री वापरण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागातील पोलिस अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षक उपस्थित होते.यापुढे देखील अनधिकृत बांधकामावर अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...