Breaking News

पनवेल मनपा हवा प्रदूषण नियंत्रण मोहिमेवर आक्रमक... प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १६९ बांधकामांना बजावल्या नोटीसा

पनवेल मनपा हवा प्रदूषण नियंत्रण मोहिमेवर आक्रमक... प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १६९ बांधकामांना बजावल्या नोटीसा

पनवेल (वार्ताहर)- वाढत्या हवा प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार शहरातील सर्व प्रभागांमध्ये तपासणी, कारवाई आणि यंत्रणांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. न्यायालयीन निर्देश व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने पालिकेने प्रदूषण नियंत्रणाचे उपक्रम अधिक गतीमान केले आहेत. भरारी पथकांकडून बांधकामस्थळांवर तपासणीवर भर दिला जात आहे. त्यानुसार खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा व पनवेल या प्रभागांमध्ये उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके नियुक्त केली असून बांधकाम व्यावसायिकांकडून धूळ नियंत्रणासंबंधी शासन नियमांचे पालन होते का? याबाबतची खातरजमा करण्यात येत आहे. नुकतीच कामोठे आणि खारघर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध बांधकाम स्थळांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान उप आयुक्त स्वरूप खारगे यांनी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या १५ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बांधकाम स्थळांवरील उपाययोजनांची प्रत्यक्ष तपासणी केली. महापालिका प्रशासनाने प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना एकूण १६९ नोटिसा बजावल्या आहेत.

महापालिकेतर्फे प्रभानिहाय बजावण्यात आलेल्या नोटीसांमध्ये प्रभाग समिती - अ (खारघर)१९ नोटीसा, नावडे उपविभाग -३८, प्रभाग समिती - ब (कळंबोली)३५, प्रभाग समिती - क (कामोठे) १९, प्रभाग समिती - ड (पनवेल)५८ अशा एकुण १६९ बांधकाम व्यावसायिकांना बजावलेल्या नोटीसांचा समावेश आहे.  प्रत्येक प्रभागात स्थापन केलेल्या समित्या नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकामांवर थेट कारवाई करत असून त्यांचा अहवाल आयुक्तांना सादर केला जात आहे. हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आयुक्त चितळे यांच्या निर्देशानूसार खारघर, तळोजा, कामोठे- कळंबोली व पनवेल येथे चार फॉग कॅनन या वाहनांद्रारे दररोज ५० किमीपर्यंत तुषार फवारणी करून हवेतील धूळ नियंत्रण केले जात आहे. या गाड्यांवरती जीपीएस ट्रॅक्ींग सिस्टीमही बसविण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा एमआयडीसी भागात, कामोठे जव्हार इंडस्ट्रियल व पनवेल इंडस्ट्रियल भागात विविध कंपन्यामुळे परिसरामध्ये होणारे हवेच्या प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ,पनवेल शहरातील निवासी भागामधील हवेतील विविध घटकांची पातळी आणि हवामान घटकांचे निरीक्षण, मोजमाप करून नागरिकांना अचूक माहिती देण्यासाठी मंकी पॉइंट, उत्सव चौक,आयजीपीएल नाका, कळंबोली प्रवेशद्रार, कामोठे पोलीस स्टेशन, संताजी महाराज जगनाडे चौक व वडाळे तलाव अशा 0७ ठिकाणी रिअल टाईम अम्बिएंट एअर क्वालिटी डस्ट मॉनिटर ण्ड मेट्रॅलॉजिकल पॅरामिटरर्स स्थापित करण्यात आले आहेत.

हवा शुद्धीकरण यंत्रणेची उभारणी

सध्या कोपरागाव, खारघर, राणी लक्ष्मीबाई चौक, नावडे, लेबर नाका, कळंबोली, एमजीएम हॉस्पिटल समोर, कामोठे प्रवेशद्वार अशा ५ ठिकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टीम कार्यरत आहेत. तर आणखी ५ ठकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...