Breaking News

वाशी विभाग कार्यालयातील भ्रष्टाचाराची आयुक्तांकडे तक्रार... आयुक्तांकडून कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बदलीसह भ्रष्टाचाराची पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश

वाशी विभाग कार्यालयातील भ्रष्टाचाराची आयुक्तांकडे तक्रार... आयुक्तांकडून कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बदलीसह भ्रष्टाचाराची पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश

वाशी (प्रतिनिधी) - वाशी विभाग कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला असल्याची तक्रार हिंद मजदूर किसान पंचायत संघटनेतर्फे काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाव्दारे करून याप्रकरणी आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले होते.  या तक्रारी निवेदनात, विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांची आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दखल घेत अखेरीस कंत्राटी कर्मचारी राहूल ओहोळ याची तात्काळ बदली करून भ्रष्टाचाराची तक्रार पोलिसांत करण्याचे आदेश प्रशासन उपायुक्तांना दिल्याची माहिती हिंद मजदूर किसान पंचायतचे सरचिटणीस डॉ. प्रफुल्ल शारदा ना.म्हात्रे यांनी पत्रात दिली आहे. वाशी विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी हिंद मजदूर किसान पंचायततर्फे आयुक्तांकडे दि.१७ नोव्हेंबर रोजी पत्रव्यवहार करून या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत, वाशी विभाग कार्यालयातील फोफावलेला भ्रष्टाचार थांबविण्यासह कंत्राटी कर्मचारी राहूल ओव्हल, प्रशासन अधिकारी नवनाथ खडे यांचे निलंबन करण्यात यावेत तसेच कॅश कलेक्शन उत्पन्नाची चौकशी करावी अशा मागणी करण्यात आली होती. दरम्यान, हिंद मजदूर किसान पंचायत संघटनेतर्फे वाशी विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या करण्यात आलेल्या या गंभीर आरोपांची आयुक्तांनी दखल घेत, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांना आयुक्तांनी फोनद्वारे आदेशीत केले कि, संघटनेतर्फे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत. हा कोण राहूल आहे. त्याची तत्काळ बदली करून भ्रष्टाचाराची तक्रार पोलिसांत करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, आयुक्तांनी हिंद मजदूर किसान पंचायतच्या शिष्टमंडळास याप्रश्‍्नी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यानुसार शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली असता, त्यांनी त्वरीत विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांना संपर्क साधला व हा राहूल ओहोळ कोण आहे व त्याचा आका कोण आहे. त्याची अशाप्रकारे भ्रष्टाचार करण्याची हिंमत कोणामुळे होते अशी विचारणा केली असल्याचे हिंद मजदूर किसान पंचायतचे सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी सांगितले. यानंतर हिंद मजदूर किसान पंचायतच्या शिष्टमंडळाने महिला, पुरुष सुरक्षा रक्षक आणि एजंट आयुब खान यांच्या मोबाईलमधील गुगल पेमेंट प्रशासन उपायुक्तांना दाखविले. त्यानंतर त्वरीत प्रशासन उपायुक्तांकडून सुरक्षा रक्षकांच्या तसेच राहूल ओहोळ यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांना सध्या मुख्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये पाठविण्यात आल्याचे समजते. यावेळी फेरीवाल्यांच्या प्रश्‍नावर चर्चा करतांना, स्थानिक फेरीवाले व बाहेरील फेरिवाले कोण यांचे त्वरीत सर्व्हेक्षण सुरू करावेत. याप्रश्‍्नी वनमंत्री गणेश नाईक यांनी शहराबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश दिल्याची बाब विभाग अधिकारी येडवे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. दरम्यान, फेरीवाल्यांच्या प्रश्‍नी व महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल हिंद मजदूर किसान पंचायततर्फे सरचिटणीस डॉ.प्रफुल्ल म्हात्रे यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांचे आभार मानले आहेत.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...