Breaking News

सिडकोतर्फे अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर धडक कारवाई...

सिडकोतर्फे अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवर धडक कारवाई...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहिम तीव्र केली असून, काल या विभागाने सानपाडा नोड येथे निष्कासन मोहिम राबवुन सिडकोच्या अधिसूचित, संपादित जागेवरील व रेल्वे स्टेशन परिसरातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे निष्कासित केली असल्याची माहिती सिडकोने दिली. सिडकोच्या या कारवाईत, सानपाडा नोड, सेक्टर-२४, भूखंड क्र. ६१ व ६२, येथील अंदाजे क्षेत्रफळ ४०० चौ.मी. या जागेवरील २ अनधिकृत तात्पुरते बांबू शेड व एका पत्रा शेडचे अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला. या कारवाईसह जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरातील फुड स्टॉल धारकांच्या व दिव्यांग स्टॉलधारकांच्या वाटप केलेल्या जागे व्यतिरिक्त वाढीव जागेवरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. या कारवाईतून स्टील टेबल, २ गन्ना ज्युस मशीन, काउंटर असे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सानपाडा रेल्वे स्टेशन व कीओस्क स्टॉल भोवती असलेला स्टील काऊंटर व स्टील टेबल असा माल जप्त केला आहे. तसेच पक्के किचन, 3 बेसीन, २ पक्की भिंत, १० बांबू ताडपत्री शेड, निष्कासित करण्यात आले. सदरची ही कारवाई सहा. कार्यकारी अभियंता (पीपीअँडक्यू) यांच्या समवेत पूर्ण करण्यात आली. कारवाई केलेली उपरोक्त अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे ही सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून अथवा संबधित प्राथिकरणाकडुन कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्यामुळे निष्कासित करण्यात आले. या कारवाईसाठी १ जेसीबी, ३ जीप, १ टेम्पो ट्रॅव्हलर. १२ कामगार व २ टेम्पो असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकाम (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विमागाचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी, सिंडको पोलीस पथक, सिडको सहा.सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक,महाराष्ट्र सुरक्षा बलचे सुरक्षा रक्षक, सहा.कार्यकारी अभियंता व महावितरण विभागाचे कर्मचारी यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली.


Most Popular News of this Week