Breaking News

कल्याण-डोंबिवलीतील उद्याने आता अधिक सुरक्षित आणि सुशोभितही

कल्याण-डोंबिवलीतील उद्याने आता अधिक सुरक्षित आणि सुशोभितही


सीसीटीव्ही-डेकोरेटिव्ह लाइटिंगची कामे पूर्ण
कल्याण : शहरातील उद्यानांमध्ये वाढती गर्दी आणि त्यातून उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांचा विचार करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने उद्यानांच्या सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल उचलले आहे.  अंदाजपत्रकात ज्या कामांना प्राधान्य देण्याचे ठरले होते, त्या सीसीटीव्ही आणि डेकोरेटिव्ह लाइटिंगच्या कामांची अंमलबजावणी आता पूर्ण झाली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उद्यानांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी आणि नागरिकांना संध्याकाळी फिरताना सुरक्षित आणि सुखद अनुभव मिळावा यासाठी आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने फास्ट ट्रॅकवर कामे करून उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे. 
महापालिकेने एकूण १७९ सीसीटीव्ही कॅमेरे विविध उद्यानात बसवले आहेत. यामुळे वॉकर्स, ज्येष्ठ नागरिक, मुलांसोबत येणारे पालक आणि महिला   या सर्वांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. काही उद्यानांत पूर्वी गर्दुल्ल्यांच्या भटक्या टोळ्या, मद्यप्राशन करणाऱ्यांची गर्दी, वाद-विवाद यांसारख्या समस्या होत्या. आता त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. संध्याकाळी उद्यानातील अंधारे कोपरे हा एक मोठा मुद्दा होता. यावर उपाय म्हणून महापालिकेने १६७ डेकोरेटिव्ह पोल बसवून प्रकाशयोजना सुधारली. यामुळे उद्यानांचा एकूण माहोल सुखद झाला असून रात्रीही लोक निर्धास्तपणे फिरू शकतात. या संपूर्ण प्रकल्पावर 3 कोटींचा खर्च झाला आहे. नवीन सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजनांमुळे उद्यानांचा चेहरामोहरा बदलला असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. काही उद्यानांत रात्रीच्या वेळेत वाढलेली गस्त आणि सीसीटीव्हीची जोड मिळाल्याने असामाजिक प्रकार रोखण्यास मोठी मदत होणार असल्याची प्रतिक्रियाही अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. 

कल्याण मधील शेनाळे तलाव, नाना धर्माधिकारी उद्यान, माता रमाबाई आंबेडकर उद्यान, रुक्मिणीबाई दवाखाना परिसर, तर डोंबिवलीतील मिनाताई ठाकरे उद्यान, सावित्रीबाई फुले रंगमंदिर, क्रीडासंकुल तरण तलाव, आनंदनगर उद्यान, भागशाळा मैदान या उद्यानांमध्ये १७९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...