Breaking News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण शहरात कडक पोलिस बंदोबस्त, शहरातून पोलिसांचे पथसंचलन

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण शहरात कडक पोलिस बंदोबस्त, शहरातून पोलिसांचे पथसंचलन

उरण (वार्ताहर) - उरण नगरपरिषदची  निवडणूक २ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबर ला होत आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये  या साठी उरण पोलीस सज्ज झाले असून नवीमुंबई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीसांनी शहरातून पथसंचलन केले.  उरण नगरपरिषद च्या निवडणुकीला काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे. सभा, कॉर्नर सभा, रॅली अशा विविध प्रकारे प्रचार केला जात आहे. त्यामुळे आरोप प्रत्यरोप होत आहेत.यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, शहरात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 2२ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी तसेच ३ डिसेंबरच्या निकालासाठी उरणमध्ये ३ अधिकारी व १०० अतिरिक्त पोलिस यंत्रणा  मागविण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दंगल नियंत्रण पथक यांनाही तयारीस ठेवण्यात येणार आहे. उरण पोलीस आणि मोरा सागरी पोलिसांच्या वतीने संपूर्ण नगरपरिषद परिसरात पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश खांदवे ,गोपनीयचे भीमराज शिंदे, जयराम पाटील यांची टीम  उपस्थित होती.
तसेच यावेळी  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.  त्याचप्रकारे शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनीफ मुलाणी यांनी सांगितले. उरणमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...