Breaking News

महाराष्ट्र भवनच्या कामातील दिरंगाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आक्रमक... महाराष्ट्र भवनाच्या आरक्षित जागेवर सरकारसह सिडकोविरोधात केले प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन

महाराष्ट्र भवनच्या कामातील दिरंगाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आक्रमक... महाराष्ट्र भवनाच्या आरक्षित जागेवर सरकारसह सिडकोविरोधात केले प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन

नवी मुंबई (प्रतिनिधी) - वाशीतील महाराष्ट्र भवनच्या कामातील दिरंगाईवरून नवी मुंबई राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांच्या नेतृत्वाखाली काल सरकार व सिडको यांचे प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन महाराष्ट्र भवनासाठी आरक्षित असलेल्या वाशीतील भूखंडावर करण्यात आले.  राज्याचे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे विराजमान असताना महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी त्यांनी बजेटमध्ये १२१ कोटींची तरतूदीची घोषणा मागील जुलै २०२४ मध्ये केली होती. मात्र त्यानंतरही भवनाच्या बांधकामासाठी होणारा उशीर व दुसऱ्यांदा भूमिपूजन होणार असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश आमले यांच्या नेतृत्वाखाली काल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सरकार व सिडको यांचे प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन करून निषेध नोंदविला.  यासंदर्भात राष्ट्रवादीचे म्हणणे आहे की, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा मागील अधिवेशनात घेतला होता. परंतु त्यांना सरकारने आश्वासन देऊन महाराष्ट्र भवनचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे काल सकाळी महाराष्ट्र भवनच्या, वाशी येथील भूखंडावर महाराष्ट्र शासन व सिडको यांचे प्रतीकात्मक पिंडदान आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र भवनाचे रखडलेले काम आणि पुन्हा दुसऱ्यांदा होवू घातलेले भूमिपूजन म्हणजे निवडणूक जवळ आली की, नागरीकांच्या डोळ्यात धुळफेक आहे असा आरोप यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश आमले यांनी केला. पुन्हा दुसऱ्यांदा भूमिपूजन केले अथवा बांधकाम व कामकाज सुरू न केल्यास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन व निदर्शने केली जातील असा इशाराही डॉ आमले यांनी दिला. याप्रसंगी पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...