Breaking News

घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा

घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा

घणसोली (वार्ताहर) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नियंत्रक नवी मुंबई विभागातर्फे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईची मोहिम तीव्र केली असून काल घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामावर सिडकोने कारवाईचा हातोडा मारला. सिडकोने केलेल्या या कारवाईत, घणसोली नोड मधील सेक्टर १६ भूखंड क्रमांक ११३ व सेक्टर ११ भूखंड क्रमांक १ ते ४ येथील तात्पुरत्या स्वरूपातील असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईतून सदरचे भूखंड अंदाजे क्षेत्र ४००० चौ. मी. पूर्णपणे मोकळे करण्यात आले. सदर कारवाईसाठी १५ लेबर, १ जेसीबी, १ सुपरवायझर १ फोटोग्राफर व १ व्हिडिओग्राफर उपस्थित होते. सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून अथवा संबधित प्राधिकरणाकडुन कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता सदरठिकणी अनधिकृत बांधकामे उभारण्यात आले होते असे सिडकोने स्पष्ट केले आहे. या कारवाईसाठी १५ लेबर, प्रत्येकी १ पोकलेन, सुपरवाईजर व फोटोग्राफर असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे नियंत्रक व कर्मचारी, सिडको पोलीस पथक, सिडको सहा. सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक, महावितरण विभागाचे कर्मचारी आदींच्या सहभागाने कारवाईची ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली.


Most Popular News of this Week