Breaking News

नेरुळमधील पाणी पुरवठा कामाच्या टेंडरवरून वाद; मुख्यालयातच भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये जुपली

नेरुळमधील पाणी पुरवठा कामाच्या टेंडरवरून वाद; मुख्यालयातच भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये जुपली

नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र असे असतांना नेरूळमधील पाणी पुरवठा कामाच्या टेंडरवरून सत्ताधारी भाजपच्या प्रदीप गवस आणि रविंद्र इथापे या दोन नगरसेवकांमध्ये काल महापालिकेच्या मुख्यालयातच चांगली जुंपल्याचे समोर आल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली असून, भाजप नगरसेवकांमधील हा वाद महापालिका वर्तृळात आता चर्चेचा विषय ठरू लागला आहे. महापालिका मुख्यालयात भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये जुंपलेल्या या वादाचा प्रसंग समाजमाध्यमांमध्ये झळकला आहे. नेरुळ प्रभाग क्रं. २३ क येथील भाजप नगरसेवक प्रदीप घरत हे महापालिका मुख्यालयात असतांना प्रभागातील पाणी पुरवठा विभागातील कामाच्या टेंडरबाबत त्यांनी आक्षेप घेत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. माझ्या प्रभागातील सर्व कामे उडाली असल्याचे सांगत त्यांनी मुख्यालयात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. माझ्या प्रभागातील कामांबाबत सर्व फॉर्म्युलिटी अधिकारी वर्गाने पूर्ण करणे गरजेचे असतांना अधिकारी वर्ग थांबवून ठेवत आहे असा आरोप नगरसेवक गवस हे करतांना दिसत होते. यावेळी प्रभाग २५ ड चे नगरसेवक रविंद्र इथापे हे सदरठिकाणी उपस्थित असतांना, तुमच्या कुणाच्या विरोधात नाही असे नगरसेवक रविंद्र इथापे हे नगरसेवक प्रदीप गवस यांना उद्देशून म्हणाले. यावेळी नगरसेवक इथापे व गवस ह्या दोघांमध्ये चांगलीच जुंपली. यावेळी नगरसेवक रविंद्र इथापे हे नगरसेवक गवस यांना तुमचा काय संबंध... ठेकेदार म्हणून काम करतो असे म्हणताच, नगरसेवक प्रदीप गवस यांनी मी अधिकाऱ्यांना बोलत आहे, तुम्हाला कुठे काय बोललो. अधिकारी दबावाखाली काम करत आहे, मी सोडणार नाही असे गवस म्हणाले. नगरसेवक रविंद्र इथापे हे बोलत असतांना नगरसेवक गवस हे तुमचा आणि माझा संबंध नाही. मी तुमचा का ऐकणार नाही असे नगरसेवक रविंद्र इथापे यांना सांगताना दिसत होते. यावर नगरसेवक इथापे हे तुम्ही आमच्यावर कशाला उपकार करता असे बोलतांना दिसत होते. नगरसेवक प्रदीप गवस यांचे म्हणणे होते की, उपायुक्त अरविंद शिंदे यांनी सही करण्याची आवश्यकता नसून ते नियमात नाही. याबाबत मी उपायुक्त शिंदे यांचा जाहीर निषेध करणार असून अधिकारी चुकीचे काम करत असल्याचा आरोप केला. पाण्याची लाईन लिकेज आहे तिथे लक्ष न देता, नको तिथे काम करत आहे, जे बोलत नाही त्या नगरसेवकांची काम करत नाही व जे बोलतात त्यांची काही कामे करता असा संतापही नगरसेवक गवस यांनी व्यक्त केला व सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी केली.


Most Popular News of this Week