Breaking News

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नमुंमपा राज्यात प्रथम

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नमुंमपा राज्यात प्रथम

डिजिटल प्रशासन क्षेत्रात नवा मानदंड

नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामगिरीचे सर्वकष मूल्यमापन करणाऱ्या पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या त्रयस्थ संस्थेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या सिटी ई-गव्हर्नन्स इंडेक्स(सीईजीआय) २०२६ अहवालामध्ये नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावून डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  दरम्यान, नवी मुंबई महापालिका नागरिकांना अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असून ई-गव्हर्नन्स मध्ये राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांकाचे हे यश भविष्यातील नव्या उपक्रमांना अधिक गती देणारे ठरेल. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (पीआरओ) पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये सेवा उपलब्धता, प्रशासनातील पारदर्शकता आणि डिजिटल सुलभता या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित शेकडो निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पुणे महानगरपालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नवी मुंबई महापालिकेची ही कामगिरी केवळ एक क्रमांक नसून ती आधुनिक, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची साक्ष आहे. डिजिटल इंडिया, महाराष्ट्र ई- गव्हर्नन्स धोरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत अशा अनेक उपक्रमांमुळे हे यश शक्‍य झाले आहे. महापालिकेच्या विविध नागरिकाभिमुख ऑनलाइन सेवा, सुलभ डिजिटल व्यवहार, कार्यक्षम तक्रार निवारण प्रणाली तसेच्‌_.पाल.रसी.ळप ही वेबसाईट आणि चू छचचउ या मोबाईल अँपद्रगारे उपलब्ध माहितीची सुसंगतता आणि अद्ययावतपणा यामुळे नवी मुंबई महापालिकेला हा मानाचा प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या या मानांकनाबद्दल महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे कौतुक करीत महानगरपालिकेच्या यशाबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

नवी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी २४७ ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिक आता घरबसल्या प्रमाणपत्रे मिळवू शकतात, कर भरू शकतात, तक्रारी दाखल करू शकतात आणि त्यांच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात.महानगरपालिकेने ई- ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करून पेपरलेस प्रशासनाकडे वाटचाल सुरू केली आहे. फाईल हालचाली, मंजुरी प्रक्रिया आणि नोंदी डिजिटल माध्यमातून केल्या जात आहेत. विविध विभागांचे एकत्रित व्यवस्थापन करण्यासाठी एठझ आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे विभागांमधील समन्वयात सुधारणा झालेली आहे.

स्मार्ट सिटी उपक्रम, अँटडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, सीसीटीव्ही व एआय आधारित निरीक्षण, डेटा अनालिटिक्स डॅशबोर्ड, नागरिक संवाद प्रणाली, नागरिकांवरील सकारात्मक परिणाम, कार्यालयीन भेटी कमी, सेवा वितरणात गती, पारदर्शकता वाढ, विश्वासार्ह प्रशासन अशा विविध बाबींना ह्या यशाचे गमक मानले जात आहे. मागील वर्षांत नवी मुंबई महापालिकेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ई-गव्हर्नन्स क्षेत्रात सातत्यपूर्ण सुधारणा करत नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ ऑनलाईन सेवा देण्यावर विशेष भर दिला आहे. डिजिटल माध्यमांतून सेवा विस्तार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, ट्रॅकिंग सुविधा, तसेच नागरिकांच्या सहभागासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सचा सकारात्मक परिणाम या निर्देशांकात दिसून आला आहे.

९.११ इतके गुणांक प्राप्त करून पहिल्या स्थानावर झेप...

मागील पाच वर्षात २९ महानगरपालिकांनी ई-गव्हर्नन्स साठी केलेल्या कामांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला असून यावर्षी नवी मुंबई महापालिकेने लक्षणीय कामगिरी करुन ९.११ इतके गुणांक प्राप्त करीत थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली असल्याचे पीआरओचे अध्यक्ष तन्मय कानिटकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.


Most Popular News of this Week