नवी मुंबई महापालिकेच्या आखाड्यात शिंदे विरुद्ध नाईक लढतीचेच चित्र
नवी मुंबई महापालिकेच्या आखाड्यात शिंदे विरुद्ध नाईक लढतीचेच चित्र
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीत प्रामुख्याने महायुतीमधील दोन बलाढ्य नेते ना. गणेश नाईक आणि ना.एकनाथ शिंदे यांच्यातच नवी मुबंईमध्ये लढत होणार असे चित्र आहे. १३ वर्षाहन अधिक काळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्रीपद भूषवणाऱ्या गणेश नाईक आणि त्यानंतर राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर नव्या शिवसेनेचे नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महायुती न झाल्याने नवी मुंबईत आता भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असा सामना होण्याबरोबरच महाविकास आघाडी मनसे सोबत रणदुंदूभी होणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही ठाणे जिल्ह्यातील शिंदे विरुद्ध नाईक अशा मातब्बर नेत्यांमध्ये होणार आहे.
नवी मुंबईचा मागील निवडणुकीचा आखाडा पाहता २०१५ मध्ये राष्ट्रवादीत असताना विद्यमान वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ५२ जागांवर विजय मिळवत मोदी लाट असताना सुद्धा करिष्मा दाखवला होता. राष्ट्रवादीत असताना नाईकांच्या घराणेशाहीला सुरुंग लावण्याचा त्याकाळी एकत्र असणाऱ्या शिवसेना भाजपाचा मनसुबा मात्र यशस्वी झाला नाही. काँग्रेसला १०, शिवसेनेला ३७ जागा मिळवता आल्या. तर गणेश नाईक यांनी सत्तेसाठीचा (५६) जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्षांची साथ घेत काँग्रेसच्या मदतीने २०१५ मध्ये नवी मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन केली होती. वाटाघाटीच्या चर्चेअंती अडीच वर्षात अपक्ष महापौर सुधाकर सोनवणे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश लाड हे उपमहापौर झाले. तर पुढच्या अडीच वर्षात जयवंत सुतार महापौर आणि काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे उपमहापौर झाल्या.
२०१५ च्या निवडणुकीनंतर तब्बल साडेदहा वर्षांनी होणाऱ्या यंदाच्या मनपा निवडणुकीत उमेदवारांना मोठं महत्त्व आलं आहे. राष्ट्रवादी सोडून गणेश नाईक पिता पुत्र २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्या निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुती असल्याने गणेश नाईक पुन्हा एकदा आमदार झाले. मात्र त्यांना भाजपने मंत्रिपद दिले नाही. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजपाचे गणेश नाईक दुसऱ्यांदा ऐरोली मतदारसंघातून विजय झाले. त्यानंतर भाजपाने गणेश नाईकांना वनमंत्री पद दिले. राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तन आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक वनमंत्री झाल्याने यंदाच्या निवडणुकीचे चित्र पालटले आहे. त्यातच राज्यात भाजपा शिवसेना शिंदेगट सत्तेवर असल्याने या निवडणुकीला एक वेगळा रंग प्राप्त झाला आहे.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाची महायुती होईल अशी अपेक्षा होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याकरता अवघे काही तास उरलेले असताना भाजपा शिवसेना शिंदे गटात थेट लढत होणार आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाने पळवल्याने त्यांना स्थानिक पातळीवर नेतृत्त्व शोधावे लागणार आहे. तशीच बिकट अवस्था महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरेगट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसची झाली आहे. कारण या तिन्ही पक्षांकडे असणारे प्रमुख नेते माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष शिंदे गटाने फोडल्याने महाविकास आघाडीला यंदाच्या निवडणुकीत नवी उमेद घेत ही निवडणूक लढवावी लागणार आहे. अर्थातच महायुती न झाल्याने नवी मुंबईतील प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट अर्थात नाईक विरुद्ध शिंदे असा सामना पहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत ज्यांचे संख्याबळ जास्त असेल त्यांचा महापौर होण्याची आगामी काळात शक्यता असून निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येत सत्ता काबीज करतील, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
