नवी मुंबईकरांना कल्याणसाठी करता येणार थेट लोकल प्रवास... बहुप्रतिक्षीत ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्पाला मिळणार गती!
नवी मुंबईकरांना कल्याणसाठी करता येणार थेट लोकल प्रवास... बहुप्रतिक्षीत ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्पाला मिळणार गती!
भोलानगरातील ३४८ घरांचे होणार पुनर्वसन
नवी मुंबई (प्रतिनिधी) - तब्बल मागील आठ वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्पास गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात बैठक घेतली होती. या प्रकल्पात मुख्य मार्गिकेतून नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या वेशीवरील दिघ्यातील भोलानगर येथील बाधित होणाऱ्या तब्बळ ९५० घरांपैकी 3४८ घरांच्या अंतिम सर्व्हेचे काम झाले असून त्यांचे बाळकुम येथील निवासी संकुलात एमएमआरडीकडून पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी पनवेल-वाशी-कल्याण रेल्वे प्रकल्पासाठी एमआरव्हीसी, एमएमआरडीए, ठाणे महापालिका, रेल्वे बोर्ड या प्राधिकरणाकडून ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पातील बाधित सावित्रीबाई नगर येथील काही घरांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र त्यापुढील भोलानगर, न्यू शिवाजीनगर, कळवा स्टेशन रोड परिसरातून जाणाऱ्या पुलाच्या मार्गिकेतील नागरिकांनी सरसकट पुर्नवसनाची मागणी लावून धरत, हा प्रकल्प रोखून धरला आहे. दरम्यान, ८ ते ९ वर्षांपासून रखडलेल्या या पुलाबाबत राज्य सरकारने लक्ष घालत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व प्राधिकरण आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीत एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन) भोलानगर येथील नागरिकांच्या पुर्नवनसनाचा अहवाल सादर करीत ३४८ घरांच्या सर्व्हेंचे काम पुर्ण झाले असून पुलासाठी आवश्यक असणाऱ्या ३४८ घरांचे पुर्नवसन करण्यासाठी एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठवल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार एमआरव्हीसी आणि एमएमआरडीएने घरांचा सर्व्हे पुर्ण केला तसेच याठिकाणी पुर्नवसीतांची नावे प्रकाशित करुन बाधित नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. एमएमआरडीतर्फे ठाण्यातील बाळकुम परिसरात रेंटल हौसिंग सोसायटीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. अंतिम सर्व्हेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर काही नागरिकांनी विरोध दर्शविला असला तरी त्यांनी पुर्व संमती दर्शविल्यानेच त्यांना पुर्नवसन केलेल्या ठिकाणी जावे लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने यासंदर्भात बोलतांना सांगितले.
दरम्यान, भोलानगर, न्यू शिवाजीनगर येथील ३५०० घरांचे एस.आर.ए.च्या माध्यमातून राज्य शासन आणि ठाणे महापालिका यांचेकडून पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर ठाणे महापालिकेने आमदार, खासदार, माजी लोकप्रतिनिधी आणि भोलानगर रहिवासी संघाच्या मागणीनुसार याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे या पुलाचे काम सुरु झाल्यावर जीव धोक्यात घालून राहणाऱ्या उर्वरित नागरिकांच्या पुर्नवसनाचा देखील मार्ग मोकळा झाला आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
