खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी ठाण्यात समितीची स्थापना
खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांची शहानिशा करण्यासाठी ठाण्यात समितीची स्थापना
मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाहीबाबत ठाणे महापालिकेचा भर
ठाणे (प्रतिनिधी) - रस्त्यावरील खडडे, उघडी गटारे, तसेच रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटीमुळे झालेल्या मृत्यू किंवा जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना भरपाई निश्चित करुन ती वितरीत करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिले आहेत. या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त, ठाणे महापालिका ठाणे यांची अध्यक्ष व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांची सदस्य म्हणून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली.
महापालिका आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव व समितीचे सदस्य रविकांत पाझरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, विधी सल्लागार मकरंद काळे, उपनगरअभियंता विकास ढोले, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच विविध प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरात रस्त्यावरील खड्डे, उघडी मॅनहोल्स किंवा रस्त्याच्या देखभालीतील त्रुटीमुळे नागरिकाचा मृत्यू झाला असेल अथवा जखमी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ठाणे महापालिका क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले. या प्रकरणांमध्ये समिती कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा करुन जर अपघाताचे कारण रस्त्यावरील खड्डे किंवा उघडे मॅनहोल असल्यास तक्रारदार अपघातग्रस्ताला किंवा अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकाच्या नातेवाईकांना चौकशी करुन नियमांनुसार आवश्यक ती भरपाई महापालिकेमार्फत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अपघात घडल्यानंतर तक्रारदाराने ४८ तासात समितीकडे तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.
रस्त्यावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातांची समितीमार्फत शहानिशा करताना रस्त्याची मालकी कोणाची आहे, सदर रस्ता महापालिकेकडे हस्तांतरीत केला आहे का? तसेच अपघात ज्याठिकाणी घडला त्या संबंधित पोलीस ठाण्याने केलेला पंचनामा आदी सर्व बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. अनेकदा वाहनांची टक्कर होवून किंवा वाहनाने धडक दिल्यानेही अपघात होतात, असे अपघात वगळून केवळ खड्यांमुळे झालेला अपघात व उघडी मॅनहोल्स याबाबत झालेल्या अपघातांची शहानिशा समितीमार्फत केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष सौरभ राव यांनी नमूद केले.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
