शहरातील हवेची गुणवता सुधारण्यासाठी मिरा भाईंदर मनपाची धूळ नियंत्रण मोहीम!
शहरातील हवेची गुणवता सुधारण्यासाठी मिरा भाईंदर मनपाची धूळ नियंत्रण मोहीम!
डस्ट कंट्रोल यंत्रणेव्दारे पाण्याची फवारणी
भाईंदर (वार्ताहर) - मिरा-भाईंदर शहरातील वाढत्या धूळकणांच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी मिरा- भाईंदर महापालिका प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरातील पर्यावरणास सुरक्षित ठेवत नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा यांच्या निर्देशानुसार डस्ट कंट्रेल यंत्रणेचा वापर करून नियमितपणे पाण्याची वारणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे रस्त्यावरील धूळकणांचे प्रमाण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होत आहे. दि.१ डिसेंबर रोजी शहरातील प्रमुख मार्गांवर - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फाऊटन ते गायमुख परिसरात डस्ट कंट्रोल मशीनच्या सहाय्याने पाण्याची व्यापक फवारणी करण्यात आली. वाहतुकीची सततची वर्दळ, रस्त्याचे कामे आणि कोरडे वातावरण यामुळे निर्माण होणाऱ्या धूळकणांमुळे परिसरातील हवा टूषित होत असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत महापालिकेची ही कारवाई पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली आहे. तसेच दि. २ डिसेंबर रोजी प्रभाग समिती क्र ०३, ०४, ०५ आणि 6६ च्या कार्यक्षेत्रातही पाण्याची फवारणी करण्यात आली. विविध प्रभागातील महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि प्रटूषणप्रवण परिसरांमध्ये ही फवारणी करून धूळीकणांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महानगरपालिका प्रशासन नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील असून धूळकण नियंत्रण उपाययोजना नियमितपणे राबविण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
