क्लीनरचे अपहरण प्रकरण... चौकशीसाठी माजी आयएस दिलीप खेडकर यांची रबाळे पोलिस ठाण्यात हजेरी...
क्लीनरचे अपहरण प्रकरण... चौकशीसाठी माजी आयएस दिलीप खेडकर यांची रबाळे पोलिस ठाण्यात हजेरी...
ऐरोली (प्रतिनिधी) - गाडीचा अँक्सिडंट झाल्यानंतर कुणी कुणाचे अपहरण करत असते का? असा सवाल उपस्थित करून आम्ही या प्रकरणात निर्दोष आहोत असा दावा वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना नुकताच केला. रबाळे पोलिस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी एका मिक्सर ट्रकची खेडकर यांच्या कारला धक्का लागला होता. या कारणावरून मिक्सर चालकाचा सहकारी असलेला क्लिनर प्रल्हाद कुमार याचे ऐरोलीतून अपहरण करण्याचा प्रकार घडला असल्याच्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी याप्रकरणी दिलीप खेडकर याच्यासह प्रफुल्ल साळुंखे आणि मनोरमा खेडकर व इतर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात खेडकर कुटूंबाला न्यायालयाकडून अटक पूर्व जामीन मिळाला असल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरूषोत्तम खेडकर यांनी नुकतीच सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी रबाळे पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती. यावेळी पुरूषोत्तम खेडकर यांची दिवसभर चौकशी झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता, ते बोलत होते.
यावेळी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडतांना माजी आयएएस अधिकारी पुरुषोत्तम खेडकर म्हणाले की, आमच्या गाडीला टॅंकरने धडक दिल्याने अपघात घडला होता. त्याबद्दल आमच्याविरोधात जो गुन्हा दाखल झाला होता. त्याविरोधात आम्ही अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली असता, आम्हाला जामीन मंजूर झालेला आहे व सदरचा जामीन मंजूर करतांना प्रामुख्याने तुम्ही पोलिस ठाण्यात जावून पोलिसांना तपासात सहकार्य करावे अशा अटी व शर्ती न्यायालयाने दिल्या आहेत. त्यानुसार आज आम्ही पोलिस ठाण्यात आलो असून, पोलिसांना जी काही माहिती पाहिजे होती ती दिली आहे. आमचा या प्रकरणात फरार होण्याचा विषयच नाही. जर आमच्यावर खोटा गुन्हा दाखल होत असेल व पोलिस यात आम्हाला अटक करण्याची शक्यता असेल तर ती एक प्रोव्हिजन असून त्यानुसार आम्ही कोर्टात जावून याप्रकरणी अटकपूर्व जामीन घेतला आहे. अपहरण करण्याचा विषयच नसून गाडीचा अँक्सिडंट झाल्यानंतर कुणी कुणाचे अपहरण करत असते का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच उलट या अपघातात आमच्या गाडीचे नूकसान झाले. त्या लोकांनी म्हणजे हेल्पर याने आम्हाला विनंती केली होती की, तुम्ही आमच्यावर केस करू नका व त्यानुसार सहानुभूती म्हणून आम्ही केस केली नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्याकडे गाडीचा इन्सूरन्स आहे व पाहिजे तर त्यातून नुकसान भरपाई होईल व बाकी तुम्ही काही करा या भावनेतून हेल्पर आमच्यासोबत आला होता. मात्र नंतर त्याचे स्टेटमेंट बदलले असल्याचे पुरूषोत्तम खेडकर यांनी नमूद केले. अपहरण केल्यानंतर कुणी कुणाला स्वत:च्या घरात ठेवत नसते. हेल्पर स्वत: आमच्यासोबत आला होता. त्यानंतर त्यास आमच्या माणसांनी बस स्टॅंडवर सोडल्यानंतर तो परत आला होता. आम्ही या प्रकरणात पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करत असून आम्ही निर्दोष आहोत. खरं तर मला कुणी तरी जाणून बुजून मारण्याचा प्रकार तर करत नाही ना असा सवाल त्यांनी करून तशा स्वरूपाची तक्रारही आपण रबाळे पोलिस ठाण्यात केली असल्याचे खेडकर यांनी सांगितले. सध्या या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नसल्याने तपशीलावर अधिक माहिती देता येत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
