Breaking News

महाराष्ट्र भवनच्या कामावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली...

महाराष्ट्र भवनच्या कामावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली...

राष्ट्रवादीचे पिंडदान म्हणजे राजकीय स्टंटबाजी!

भाजप नवी मुंबई जिल्हा सचिव पांडूरंग आमलेंची टिका

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाच्या कामावरून राष्ट्रवादी- भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई रंगलेली असतांनाच काल भाजपचे नवी मुंबई जिल्हा सचिव पांडुरंग आमले यांनी या विषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपची भूमिका स्पष्ट करतानाच, राष्ट्रवादीच्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासह राष्ट्रवादीचे (शप) नवी मुबई जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांनी काही दिवसांपूर्वी भवनाच्या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत केलेले पिंडदान आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी असल्याचा टोला राष्ट्रवादीवर हाणला. यावेळी सचिव पांडूरंग आमले यांनी महाराष्ट्र भवनासारख्या भूषणावह वास्तूत खो घालू नका असा सल्लाही याप्रकरणी राजकारण करणाऱ्यांना दिला. यावरून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन पक्षांमध्ये जुंपली असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश आ.शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला होता. महाराष्ट्र भवनासाठी होणारा विलंब लक्षात घेता या विरोधात राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ.मंगेश आमले यांनी गत शुक्रवार दि.२१ नव्हेंबर रोजी वाशीतील भवनच्या भूखंडाच्या ठिकाणी सरकार आणि सिडको यांचे प्रतीकात्मक पिंडदान करून आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर काल भारतीय जनता पक्षातर्फे भाजपचे जिल्हा सचिव पांडुरंग आमले यांनी पत्रकार परिषद घेवून यासंदर्भात भाजपची भूमिका मांडली. यावेळी पत्रकार परिषदेत सचिव पांडूरंग आमले यांनी सांगितले की, नवी मुंबई शहरासाठी भूषणावह असणाऱ्या महाराष्ट्र भवनाच्या कामात खोडा घालण्याचा हा प्रकार असून ही बाब अत्यंत निंदनीय असल्याची टीका त्यांनी केली . नवी मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र भवनाचे काम मागील पंधरा वर्षाचा पाठपुरावा करून आमदारांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. याचे काम सुरू असताना पिंडदान आंदोलन करणे म्हणजे हा केवळ राष्ट्रवादीचा राजकीय हट्ट असल्याचे पांडूरंग आमले यांनी नमुद केले. चांगल्या कामाची सुरुवात अशा प्रकारे करणे व मुळात पिंडदान आंदोलनाची भूमिका जनतेला आवडलेली नाही. जर आंदोलन करायचे होते तर सिडकोविरोधात आंदोलन करणे योग्य होते व यातून मध्यम मार्ग देखील आमदारांची चर्चा करून काढण्यात आला असता. मात्र, राष्ट्रवादीने महाराष्ट्र भवनाच्या कामात खोडा घालण्याचा हेतू पुरस्कार प्रकार केल्याचा आरोप पांडुरंग आमले यांनी केला आहे. शहरासाठी एखादी भूषण व वास्तू होत असताना त्यात एक सामायिक भूमिका असणे देखील तितकेच गरजेचे आहे. या भवनाच्या उभारणीनंतर त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. असे देखील आमले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र भवनचा हा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार असून विशेष करून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने आपापसात आरोप प्रत्यारोप सुरू केल्याने महाराष्ट्र भवनाच्या मुद्याला राजकीय वळण लागले आहे.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...