नवी मुंबईतील २२ पोलीस ठाणे ११ शाखांना आयएसओ
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून गौरव
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील २२ पोलीस ठाणे आणि ११ इतर शाखांना मंगळवारी गुन्हे आढावा बैठकीचे औचित्य साधून पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याहस्ते आयएसओ मानाकंन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषांचा अवलंब करुन विश्वासार्हता निर्माण करणे, पोलीस ठाणे आणि शाखांमधील कामकाज वेळेत व कार्यक्षमतेने पुर्ण करुन जनतेच्या समाधानात वाढ करणे, प्रत्येक कामासाठी निश्चित अशी मानक कार्यप्रणाली तयार करुन ती काटेकोरपणे राबविणे, सर्व कामकाज पारपदर्शक व नियमबध्द पध्दतीने पार पाडणे, कामकाजात येणाऱ्या सर्व त्रुटी टुर करुन नवनवीन उपक्रम आणि संकल्पना राबवून सुधारणा साधणे, सर्व स्तरांवर लोकसहभाग व जनतेचा विश्वास वाढविण्यावर भर देणे हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयास आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचा प्रमुख उद्देश आहे. विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय त्यांच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्यासह एकुण २२ पोलीस ठाणे व इतर शाखांमध्ये पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत गुन्हे शाखा, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग व मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष (ईएमसी) अशा एकुण ३१ पोलीस ठाणे, इतर शाखांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याहस्ते पोलीस अधिकाऱ्यांना मानांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रामुख्याने वाशी परिमंडळ पुरस्कार-: वाशी, एपीएमसी, रबाळे, कोपरखैरणे, रबाळे एमआयडीसी, २) पनवेल परिमंडळ- खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका, ३) तुर्भे परिमंडळ- तुर्भ एमआयडीसी, नेरूळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर, सानपाडा, ४) पोर्ट परिमंडळ- उरण, न्हावाशेवा, मोरा सागरी, उलवे व ५) इतर विभाग- गुन्हे शाखा (मुख्यालय), विशेष शाखा आणि प्रशासन, डीसीपी ट्राफीक, सायबर सेल, पोलिस मुख्यालय, मोटार ट्रन्सपोर्ट शाखा, पुरावा व्यवस्थापन केंद्र यांचा समावेश आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
