Breaking News

उरण नगरपरिषद निवडणूक : २१ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

उरण नगरपरिषद निवडणूक : २१ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

उरण (वार्ताहरा) - उरण नगरपरिषद निवडणुक संदर्भात दि.२१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ४ उमेदवार, तर नगरसेवक पदाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार अंतिम रिंगणात असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता उरणमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट टक्कर रंगणार असून, शिवसेना शिंदे गट व अपक्ष उमेदवारांच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागांत बहुकोनी लढती अधिक चुरशीच्या झाल्या आहेत. आता निवडणुक उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचारात अधिकच रंगत येणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कोळी शोभा भुवन, महाविकास आघाडीकडून घाणेकर भावना कुं दन, शिंदे गटाकडून रुपाली तुषार ठाकूर, तर अपक्ष म्हणून शेख नसरीन इसरार या चार उमेदवारांची नावे अंतिम आहेत. नगरपरिषद प्रमुख पदासाठीची ही चौकोनी लढत शहराच्या राजकीय समीकरणात नवे ताण आणणारी ठरणार आहे. नगरसेवक पदांच्या २१ जागांसाठीच्या सर्व प्रभागांची उमेदवार यादीही दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित झाली आहे. तसेच सर्व ४८ उमेदवारांची निवडणूक लढत निश्चित झाली आहे.दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्येक प्रभागातील स्पर्धा सुटसुटीत झाली असली तरीही मतांचे तिढे व गणित गुंतागुंतीचे बनले आहेत. अनेक प्रभागांत भाजप व महाविकास आघाडी यांच्यात थेट आमनेसामने लढत दिसत असली तरी शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांचे अस्तित्व निर्णायक ठरू शकते.


Most Popular News of this Week