Breaking News

'नवे शैक्षणिक धोरण: शिक्षकासाठी संधी ब आव्हाने नवी मुंबई महापालिकेतर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात

'नवे शैक्षणिक धोरण: शिक्षकासाठी संधी ब आव्हाने नवी मुंबई महापालिकेतर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात

वाशी (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे “नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: शिक्षकांसाठी संधी व आव्हाने" या विषयावर विशेष व्याख्यानसत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या व माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चेंबूर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ.श्री.चंद्रशेखर चक्रदेव हे उपस्थित होते. या कार्यक्रमात "प्रथम संस्थेच्या फरीदा लांबे यांनीदेखील ऑनलाईन उपस्थित राहून शिक्षकांशी थेट सुसंवाद साधला. त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि विद्यार्थी घडवताना प्रत्यक्ष येणाऱ्या व्यावहारिक अडचणींवरही चर्चा केली. नमुंमपा शिक्षण विभाग उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यशाळेस नवी मुंबईतील प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील सर्व व्यवस्थापन व माध्यमांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ उपस्थित बहुसंख्य शिक्षकांनी घेतला. या कार्यशाळा आयोजनासाठी शिक्षणाधिकारी अशोक कडुस,सहाय्यक आयुक्त दिपाली दिवेकर, सर्व केंद्र समन्वयक यांचे योगदान लाभले. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सांगता करताना आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देऊन त्यांचे सातत्याने मूल्यमापन होण्याची गरज विशद केली. त्यादृष्टीने शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांची कौशल्ये वाढविणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील आव्हानांसाठी तयार करणे हे या नवे शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...