Breaking News

सिडकोतर्फे ४५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर

सिडकोतर्फे ४५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या इतिहासात प्रथमच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; या तत्त्वावर ४,५०८ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली असून, आज शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे.

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृह संकुलांतील ४,५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अर्जदारांना प्रथमच स्वत:च्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

सिडकोच्या सोयी सुविधांनी सुसज़़् गृहसंकुलांतील ४,५०८ सदनिका या योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेकरिता सोडत किंवा लॉटरी नसून आपल्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य अर्जदारांना आहे. यामुळे त्यांना शब्दश: आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे. या योजनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबईत आपले घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याकरिता अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले आहे.

सिडकोतर्फे सातत्याने विविध आर्थिक उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजनांद्रारे परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेंतर्गत तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित ४,५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण ४,५०८ सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाकरिता १,११५ तर अल्प उत्पन्न गटाकरिता ३,३९३ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. २.५० लाख अनुदान उपलब्ध आहे. सदर योजनेतील सदनिका या तयार (रेडी टू मूव्ह) असून अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

या योजनेतील सर्व गृहसंकुले ही नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आहेत. या परिसरामध्ये सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीच्या अंतरावर असलेल्या या गृहसंकुलांना उपनगरीय रेल्वे, मेट्रे आणि महामार्ग यांद्रारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीकरिता लळवलेषलषी.लळवलेळपवळर.लो हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. योजनेचा सविस्तर तपशील जसे, सदनिकेचे क्षेत्रफळ, किंमत इ. देखील सदर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपासून सुरू होणार आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून त्यांच्या पसंतीच्या सदनिकेची निवड करता येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सदनिकांची विक्री केली जाणार असल्याने अर्जदारांनी उपरोक्त कालावधीमध्ये, लवकरात लवकर अर्ज करून आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

संपूर्ण रक्कमेचा भरणा केल्यास

अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वावर सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. सदनिकेच्या किंमतीच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारांना लगेच सदनिकेचा ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची संधी मिळणार आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...