ऐरोली डी मार्ट परिसरात बेशिस्तीचा कहर ; नागरिक त्रस्त
शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांचे बेशिस्त वाहनधारकांना शिस्तीचे धडे ऐरोली (प्रतिनिधी) – ऐरोली डी मार्ट या खाजगी आस्थापनेसमोरील रस्त्यावर रिक्षाचालकांसह इतर वाहनधारकांकडून केल्या जाणाऱ्या बेशिस्तीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत, वाहनचालकांना विशेषकरून रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक शिवसेनेचे प्रभाग क्रं. ५ ब येथील नगरसेवक ममित चौगुले यांनी आक्रमक पवित्रा घेत, थेट रस्त्यावर उतरून बेशिस्तपणा करणाऱ्या रिक्षाचालकांसह वाहनधारकांना मौलिक सुचना केल्या. याबाबतचा सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, शिवसेना नगरसेवकांनी केलेल्या या कृतीचे सध्या कौतूक होतांना दिसत आहे. ऐरोली डीमार्ट हा परिसर कायम गर्दीने बहरलेला परिसर समजला जातो. याठिकाणी व्यवसाय करणारे काही रिक्षा चालक हे प्रवाशी नागरिकांसोबत मनमानी करण्यासह चुकीच्या पध्दतीने आपल्या रिक्षा उभ्या करणे, प्रवाशी नागरिकांकडून जादा भाडे मागणे आणि रस्ता अडवून वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण करणे अशा स्वरूपाच्या बेशिस्तीच्या प्रकारामध्ये अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत जागरूक नागरिकांकडून नगरसेवक या नात्याने ममित चौगुले यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत, त्यांनी थेट रस्त्यावर उतरून बेशिस्त रिक्षाचालक व वाहनधारकांना शिस्तीचे व वाहतूक नियम पाळण्याचे धडे दिले. यावेळी त्यांनी बेशिस्तपणा करणाऱ्या संबंधित रिक्षा चालकांना स्पष्ट आणि ठाम शब्दांत सूचनाही दिल्या. यात, यू-टर्न फक्त नियमांनुसारच घ्यावा, योग्य तेवढेच भाडे घ्यावे आणि कोणत्याही परिस्थितीत रस्ता अडवू नये अशा सूचनाही त्यांच्याकडून करण्यात आल्या. ममित चौगुले हे बेशिस्त वाहनधारकांना सुचना देत असतांनाच याच दरम्यान दुचाकीवरून लहान मुलासह एकूण चारजण बसून प्रवास करत असल्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. यावेळी ममित चौगुले यांनी सदर दुचाकीस्वारास थांबवून तुम्ही असा जीवघेणा प्रवास करू नका निदान लहान मुलाचा विचार करा... स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे असा प्रेमाचा सल्लाही दिला. नियम तोडणाऱ्यांना आता माफी नाही, सुरक्षित आणि शिस्तबद्ध शहरासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहनही ते यानिमित्ताने करतांना दिसत होते. एकंदरीत ऐरोली डी मार्ट समोरील परिसरात बेशिस्त रिक्षाचालक व इतर वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रसंगी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिस व इतर यंत्रणांची आहे. मात्र या यंत्रणांचे या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने लोकप्रतिनिधींना आता यासाठी पुढाकार घेत रस्त्यावर उतरावे लागत असल्याने शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांच्या या कृतीचे ऐरोली परिसरात कौतूक होतांना दिसत आहे. शिस्तबद्ध शहरासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे.... ऐरोली डीमार्ट सारख्या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करण्यास खतपाणी घालणारे बेशिस्तीचे प्रकार व रिक्षाचालकांचा मनमानीपणा या प्रकारामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे हे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. नियम तोडणाऱ्यांना आता माफी नाही सुरक्षित आणि शिस्तबद्ध शहरासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. - ममित चौगुले, शिवसेना नगरसेवक प्रभाग क्रं.५
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
