नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७ साठी मालमत्ता कराची ई-बिले ऑनलाइन उपलब्ध !
नवी मुंबई महापालिकेची २०२६-२७ साठी मालमत्ता कराची ई-बिले ऑनलाइन उपलब्ध !
व्हाट्सअँप चॅटबॉट व संकेतस्थळाद्वारे नागरिकांना बिल डाउनलोड करण्याची सुविधा बेलापूर (वार्ताहर) – नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कराची ई-बिले तयार करण्यात आली असून, नागरिकांना आपले मालमत्ता कराचे बिल व्हाट्सअॅप चॅटबॉट तसेच महापालिकेच्या,.पाल.सें.ळप या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून केवळ काही मिनिटांत पाहता येईल, डाऊनलोड करता येईल आणि त्यासोबतच बिलाचा भरणा करता येणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने ही डिजीटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाईन पद्धतीने देखील घरपोच बिल वाटप करण्यात येणार आहेत. मात्र ई - बिलमुळे नागरिकांना आता ऑफलाइन बिलाची प्रतीक्षा करण्याची गरज नसून, घरबसल्या कोणत्याही वेळी आपले बिल मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत कार्यरत आहे. व्हाट्स अॅप चॅटबॉटद्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रियाः नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमधून ८२९१९२०५०४ या क्रमांकावर हाय असा संदेश पाठवावा. व त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून आपल्या पसंतीची भाषा निवडावी. पुढे पे युवर प्रापर्टी टॅक्स हा पर्याय निवडल्यानंतर आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक (प्रापर्टी आयडी) प्रविष्ट करावा. मालमत्ता क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित मालमत्तेची सविस्तर माहिती जसे की मालकाचे नाव, मालमत्तेचा पत्ता इत्यादी तपशील स्क्रीनवर दिसतील. तसेच संबंधित आर्थिक वर्ष २०२६ - २७ साठीचे मालमत्ता कराचे बिल झउन स्वरूपात उपलब्ध होईल. या पीडीएफवर क्लिक करून बिल पाहता आणि डाऊनलोड करता येईल. पे नाउ पर्याय निवडून त्वरित भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या ब्राऊझरमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (.पाल.र्सेीं.ळप) भेट द्यावी. संकेतस्थळावरील प्रापर्टी टॅक्स हा पर्याय निवडल्यानंतर नागरिकांनी आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक प्रविष्ट करावा. यानंतर संबंधित मालमत्तेची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. पुढे बील या पर्यायावर क्लिक करून नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलाची प्रत ऑनलाइन स्वरूपात पाहता तसेच डाऊनलोड करता येईल. यानंतर पे नाउ या पर्यायावर क्लिक करून थेट भरणा करता येईल. या सुविधेमुळे वेळेची बचत होणार असून, नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक वापर करून निर्धारित कालावधीत मालमत्ता कर भरावा आणि शहराच्या विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
