आ.मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी महिलांनी जल्लोषात साजरी केली धुळवड
आ.मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी महिलांनी जल्लोषात साजरी केली धुळवड
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व धुलीवंदनाचा सण त्यांच्या गौरव निवासस्थानी उत्साहात साजरा केला. हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला होळीचा सण दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. होळी हा रंग, आनंद आणि एकतेचा सण आहे. या सणानिमित्त आपल्या पारंपारिक वेशभूषेत आलेल्या बंजारा समाज, राजस्थानी महिला व कोळी महिला या प्रमुख आकर्षण होत्या. यावेळी कोळी बँड तसेच राजस्थानी गाण्यांच्या ठेक्यावर सर्वांचेच पाय थिरकताना दिसले. यावेळी आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, धुलीवंदनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील बंजारा समाज, राजस्थानी लोकगीते, श्री साईकला सर्कल बँडच्या धुमधडाक्यात रंगांची उधळण करत हा सण आज मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे. होळी हा रंगांचा सण आहे, परंतु सावधानता बाळगणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल रसायनयुक्त रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते, त्यामुळे रसायन मिसळले रंग न वापरता ऑरगॅनिक सेंद्रिय रंगाचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले तसेच सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. शक्य असेल तर फुलांच्या वर्षावाने धुळवड साजरी करावी.
आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे. होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले. यावेळी बंजारा समाजाचे पुष्पा राठोड, किरठीबाई राठोड, पार्थी राठोड, पार्थी राठोड, रुकीबाई राठोड, गीताबाई राठोड, अनिता ढोले, हसीना, सपना राठोड, रेखा गोदाम, माधुरी सावंत, अलका कामत, सिमरन शर्मा, शकुंतला शर्मा तसेच शेकडो महिला व अनिल राठोड, किशन राठोड, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, प्रभाकर कांबळे, दामोदर पिल्ले, दिवाळे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अध्यक्ष चंद्रकांत कोळी, संतोष कोळी, डोलकर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कोळी, श्याम पाटील, निलेश पाटील, कैलास कोळी, ज्ञानेवर कोळी, मोहनलाल तेली दिलीप कोळी, अविनाश कोळी, निळकंठ कोळी, जयदेव ठाकूर, संजय ओबेरॉय तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
