Breaking News

कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीकडून गुन्हे दाखल

कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीकडून गुन्हे दाखल

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई कल्याण डोंबिवली महापालिकेने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत विनायक कॉलनी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या परिसरात घंटागाडी नियमितपणे जाऊनही काही नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा न करता सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही ठिकाणी कचरा साठवून अस्वच्छता निर्माण होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले.  सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन याबाबत उपायुक्त रामदास कोकरे कडक भूमिका घेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी समन्वय साधून कोळशेवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपआयुक्त रामदास कोकरे, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड व उदय निकुंभ, स्वच्छता निरीक्षक सचिन सूर्वे, हितेश सोळंकी व अमित भालेराव, मुकादम किशोर जाधव, सानु वर्गीस, साहिल साठे, महेश बनकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना एकूण १३ समजपत्रे देण्यात आली तसेच जागेवर एन.सी. नोंदी करण्यात आल्या. गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांबाबत भारतीय न्याय संहिता, २०२३ अनुषंगाने २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे. महापालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करून निश्चित वेळेत घंटागाडीतच देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे किंवा साचू देणे हे कायद्याने दंडनीय असून संबंधितांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल. स्वच्छ भारत अभियान व स्थानिक स्वच्छता नियमांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असूनही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...