Breaking News

तुर्भतील हॉटेल विसावा येथील अनधिकृत बांधकामासह शेडवर निष्कासनाची कारवाई

तुर्भतील हॉटेल विसावा येथील अनधिकृत बांधकामासह शेडवर निष्कासनाची कारवाई

तुर्भे (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभागातर्फे सध्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार काल तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामासह शेडवर महापालिकेने धडक कारवाई केली. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने काल तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामासह शेडवर निष्कासनाची धडक कारवाई केली. या कारवाईत, तुर्भे विभाग अंतर्गत मालमत्ताधारक मे. हॉटेल विसावा, युनिट क्र. 3, भु. क्र. ६, से. १९सी, तुर्भे, यांनी युनिट क्र. 3, भु. क्र. ६, से. १९सी, तुर्भ, येथे समासी जागेत अनधिकृत बांधकाम/शेड करुन त्याचा वाणिज्य वापर सुरु केला असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या पाहणीत निदर्शनास आले होते. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम/शेडला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम मधील तरतुदीनुसार नोटीस बजावण्यात आलेली होती. मात्र त्यानंतरही सदर अनधिकृत बांधकाम, शेडचा वाणिज्य वापर सुरुच असल्याने काल अखेरीस सदरचे अनधिकृत बांधकाम, शेड निष्कासित करण्यात आले आहे. सदर मोहिमेसाठी तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे, कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक यांना देखील तैनात ठेवण्यात आले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्याकरीता 0२ गॅस कटर, १० मजूर यांचा वापर करण्यात आला आहे.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...