Breaking News

व्हाईट हाऊस बारवर पोलिसांचा छापा; १२ जणांवर गुन्हा

व्हाईट हाऊस बारवर पोलिसांचा छापा; १२ जणांवर गुन्हा

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात नियमांना न जुमानता चालवण्यात येत असलेल्या हॉटेल व्हाईट हाउस ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली आहे. पोलिस अथवा कोणत्याही यंत्रणेला न जुमानता कायद्याची पायमल्ली करण्यात संपूर्ण नवी मुंबईत कुख्यात असलेल्या या बारवर क्चितच कारवाई आजवर होत आली आहे.  तुर्भ एमआयडीसी येथील व्हाईट हाउस या आर्केस्ट्रा बारवर पोलिसांच्या पथकाने दि.१० सप्टेंबर रोजी छापा मारला. यावेळी अनेक काळापासून मनमानीसाठी चर्चेत असलेल्या या बारमध्ये उशिरा रात्रीपर्यंत अश्लीलतेचा बाजार सजत असे, मात्र आता तुर्भे पोलिसांच्या या कडक कारवाईने बारमालक आणि नियमांची दखल न घेणाऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान, मंगळवारी उशिरा रात्री पोलिसांच्या टीमने सदरची छापेमारी केली. यावेळी हॉटेलच्या आत महिला वेटर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील अंगविक्षेप आणि घृणास्पद हावभाव करत असल्याचे तसेच सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बारचा कर्मचारी, वेटर आणि व्यवस्थापक या महिलांना थांबवण्याऐवजी त्यांना अशा कृत्यास प्रोत्साहन देत होते आणि त्यांचा उत्साह वाढवत होते. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत एकूण १२ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात ७ महिला वेटर्स तसेच बारचा व्यवस्थापक त्रियोगी हौसिला मिश्रा, कॅशियर मोहम्मद इस्ताक ममताज अली आणि तीन इतर पुरुष वेटर्स यांचा समावेश आहे. सध्या आरोपींना नोटीस देण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा हा बार अनेक काळापासून सकाळी लवकर ते उशिरा पर्यंत उघडा राहत होता . त्यामुळे येथे होणाऱ्या क्रियाकलापांमुळे स्थानिक लोक त्रस्त होते.



Most Popular News of this Week