जीभेला आवर घाला; अन्यथा जुनी प्रकरणे बाहेर काढु!
जीभेला आवर घाला; अन्यथा जुनी प्रकरणे बाहेर काढु!
आनंद परांजपे यांचा शिवसेना नेते रामदास कदमांना इशारा
ठाणे (वार्ताहर) - राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेचे (शिंदे) ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेवरून महायुतीमध्ये सध्या वादाची ठिणगी पडली आहे. रामदास कदम यांनी तटकरे यांच्याबाबत केलेल्या एका अभद्र टिप्पणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. रामदास कदम यांनी यापुढे सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवावे, अन्यथा आम्हालाही त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर देता येईल, असा सज़ड इशारा परांजपे यांनी रामदास कदम यांना दिला आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी रामदास कदम यांना जुन्या प्रकरणांची आठवण करून देत इशारा दिला की, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधिमंडळात कदमांवर जे गंभीर आरोप केले होते, तसेच त्यांच्या कुटुंबाशी संबंधित डान्सबारच्या मुद्यावर आम्हाला बोलायला भाग पाडू नका. आम्ही आजवर युतीधर्माचे काटेकोर पालन केले आहे आणि सुनील तटकरे यांनीही नेहमीच समन्वयाची भूमिका घेतली आहे. मात्र, कदम यांनी आपली मर्यादा ओलांडून अभद्र भाषा वापरल्यास गप्प बसणार नाही, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना परांजपे म्हणाले की, सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. सध्या पक्ष एका अत्यंत कठीण काळातून जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या धक्कयातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीबाबत किंवा इतर राजकीय नियुक्त॒यांबाबत पक्षनेतृत्व योग्य वेळी निर्णय घेईल असेही त्यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या अपघाताबाबत बोलताना परांजपे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
