Breaking News

उपमहापौर दशरथ भगत यांचेकडून पहिल्याच दिवशी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद अन्‌ समस्या समाधान... !

उपमहापौर दशरथ भगत यांचेकडून पहिल्याच दिवशी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद अन्‌ समस्या समाधान... !

बेलापूर (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी दि.६ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिक केंद्रित कार्यपद्धतीला प्राधान्य देत कामकाजाची नव्याने सुरुवात केली आहे.  उपमहापौर पदाचा दशरथ भगत यांनी पदभार स्विकारताच नवी मुंबईचे माजी महापौर व नगरसेवक सागर नाईक यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी व नागरी सुविधांबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी उपमहापौर दशरथ भगत यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना संवेदनशीलतेने समजून घेऊन, त्यावर तातडीने व परिणामकारक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शनही केले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी थेट संपर्क, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि वेळेत समस्या निवारण हीच माझ्या कार्यपद्धतीची प्रमुख सूत्रे राहतील असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले. नवी मुंबई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना अधिक सक्षम, सुरक्षित व सोयीस्कर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कार्य करण्याचा आपला संकल्प राहील तसेच नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकाभिमुख, उत्तरदायी आणि गतिमान प्रशासन देण्याचा हा प्रारंभ असून, पुढील काळातही जनतेच्या सहभागातून शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...