युतीधर्माच्या नावाखाली शिंदेसेनेचं भाजपवरील प्रेम ठरलं एकतर्फी!
युतीधर्माच्या नावाखाली शिंदेसेनेचं भाजपवरील प्रेम ठरलं एकतर्फी!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - शिवसेना शिंदे गटाने काल महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणूकीत युतीधर्माचे पालन करत आणि शिवेसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा हवाला देत महापौर पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज परत घेतला. मात्र युतीधर्मानुसार आपणास उपमहापौर पदावर संधी मिळेल ही शिवसेना शिंदे गटाची भाबडी आशा मात्र काल फोल ठरली. भाजपने महापौर व उपमहापौर ह्या दोन्ही पदावरील दावा कायम ठेवल्याने शिवसेना शिंदे गटाने महापौर पाठोपाठ उपमहापौर पदाचा अर्जही मागे घेतला. यावेळी भाजपकडून युती धर्माचे पालन होत नसल्याबद्दल शिवसेना गटनेते मनोज हळदणकर यांनी मात्र खंत व्यक्त केली. राज्यात महायुती असल्याने इथे सत्तेमध्ये भाजपसोबत राहण्याची भुमिका शिंदेसेनेने मांडली होती. मात्र त्यास भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेने महापौर पदासाठी नगरसेविका सरोज पाटील यांचा तर उपमहापौर पदासाठी आकाश मढवी यांचा अर्ज भरला होता. या दोन्ही पदांवर अर्ज भरताना १११ सदस्यांच्या सभागृहात अवघे ४२ सदस्यांचे संख्याबळ असतानाही शिवसेना चमत्काराचा दावा करत होती. राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक निकाल नुकताच लागला. यामध्ये नवी मुंबई वगळता इतरत्र भाजप-शिवसेनेमध्ये युती झाली आहे. त्यामुळे राज्यातील बड्या नेतृत्वाकडून नवी मुंबईतील भाजप नेतृत्वावर दबाव येवून येथील महापालिकेच्या सत्तेत भाजपसोबत शिवसेनेलाही वाटा मिळेल या आशेवर येथील शिवसेना पदाधिकारी होते. मात्र कालच्या सभागृहातील परिस्थितीमुळे युतीधर्माच्या नावाखाली शिवसेनेने राज्यात मित्रपक्ष असलेल्या भाजपवर दाखविलेले प्रेम नवी मुंबईत मात्र एकतर्फी असल्याचे उघड झाले. भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष निवडणूकीत एकमेकांविरुध्द लढल्याने येथील सत्तेत शिवसेनेला वाटा देण्याचा प्रश्नच येत नाही अशी भुमिका भाजपने घेतली आहे. शिवसेनेने आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत भाजप उमेदवार अँड. निलेश भोजनेंचा अर्ज बाद करुन घेतला, यानंतर नगरसेविका रुपाली भगत यांचे नगरसेविका पद रद्द करण्याचे प्रयत्न केले. या दोन्ही प्रकरणात भाजपला न्यायालयात दाद मागावी लागली. भाजप उमेदवारांना त्रास देताना कुठे गेला होता शिवसेनेचा युतीधर्म असा सवाल करुन माजी महापौर सागर नाईक यांनी मात्र भाजपच्या भुमिकेचं समर्थन केलं.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
