वाशी रेल्वे स्थानक परिसरातील शोभिवंत दिव्यांची दूरावस्था; अंधारामुळे परिसर बनलाय गर्दुले आणि प्रेमी युगुलांचा अड्डा

वाशी रेल्वे स्थानक परिसरातील शोभिवंत दिव्यांची दूरावस्था; अंधारामुळे परिसर बनलाय गर्दुले आणि प्रेमी युगुलांचा अड्डा

संबंधित विभागांनी लक्ष देण्याची मागणी

वाशी (प्रतिनिधी) - वाशी रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आलेल्या शोभिवंत दिव्यांकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने या शोभिवंत दिव्यांची सध्या टूरवस्था झाली आहे. जागरूक नागरिक व समाजसेवक मल्हारी घाडगे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून यासंदर्भातील फोटो प्रसारित करून या प्रकाराबद्दल वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील अनेक भागांत, विशेषतः वाशी रेल्वे स्थानक परिसरातील शोभिवंत दिव्यांची दुरवस्था झाली आहे. देखभालीअभावी हे दिवे बंद पडले असून, या शोभिवंत दिव्यांची सध्यस्थितीत दूरावस्था झाली आहे. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या सुमारास निर्माण होणाऱ्या अंधाराच्या साग्राज्यामुळे येथे गूले आणि प्रेमीयुगुलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा परिसर गर्दुलले आणि प्रेमी युगुलांचा अड्डा तयार झाला आहे. विशेष म्हणजे रेल्वे आणि सिडको या दोन यंत्रणांमधील महसूली उत्पन्न वाटाघाटीत या परिसराची डागडुजी अधांतरी लटकली आहे असा आरोप करून याबाबत मल्हारी घाडगे यांच्यासह इतर जागरूक नागरिकांकडुन तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. शोभिवंत दिव्यांची दूरवस्था झाली आहे. मात्र असे असले तरी या प्रकाराकडे आणि दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरतो आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतांना दिसत आहे. अंधाराच्या साम्राज्यामुळे या ठिकाणी प्रेमीयुगुले आणि गर्टुले यांचा वावर वाढल्याने त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना विशेषकरून महिला वर्गास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीत ही परिस्थिती पाहता, संबंधित जबाबदार विभागांनी लक्ष देऊन योग्य कारवाई करुन नागरिकांची गैरसोय टूर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



Most Popular News of this Week

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

११ जणांच्या मृत्यूनंतर...

कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...