Breaking News

नवी मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी... शिवसेना-मनसे युतीचा कर्तव्यनामा प्रकाशित!

नवी मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी... शिवसेना-मनसे युतीचा कर्तव्यनामा प्रकाशित!

शिक्षण, आरोग्य, उत्तम रस्ते, महिला सुरक्षिततेला प्राधान्य

नवी मुंबई (प्रतिनिधी) - निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून प्रचारावर भर देण्यासह आपल्या पक्षाची ध्येयधोरणे, आगामी काळात नागरिकांसाठी राबविण्यात येणारी विधायक कामे आदीबाबतची घोषणा करणारे “जाहीरनामा प्रकाशित करण्याची लगबग” सुरु होत असते. त्यानुसार नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून सध्या जाहीरनामा प्रकाशित करण्यावर भर दिला जात असतानाच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या शिवसेना (उबाठा) व मनसे या पक्षांनी बुधवारी वाशीतील मर्चंट जिमखाना, येथे आपला संयुक्त जाहीरमाना प्रकाशित केला.  राज्यातील मिनी विधानसभा म्हणजेच नवी मुंबई, ठाणेसह इतर अशा एकूण २९ महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. येत्या १५ जानेवारी मतदान आणि १६ जानेवारी रोजी या महापालिकांचा निकाल जाहीर होणार आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीनिमित्ताने मनसे व शिवसेना यांची शिवयुती झाली आहे. या दोन्ही पक्षांकडून बुधवारी जाहीर केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात विविध बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मनसे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, महिला संघटक रंजना शिंत्रे, अतुल कुलकर्णी, मनसे सचिव विलास घोणे आदींच्या उपस्थित प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात प्रामुख्याने शिक्षण,उत्तम रस्ते,महिला सुरक्षितता, आरोग्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ५ वर्षे एकही खाजगी शाळेचे फी वाढून देणार नाही तसेच पारसिक हील या परिसराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. तर आरोग्याचे दरपत्रक असेल असेही आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. यासह आर्ट गॅलरी,वैद्यकीय महाविद्यालय ,प्राणी संग्रहालय, शस्त्र संग्रहालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच लोकनेते वंदनीय दि. बा. पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा मनपामध्ये प्रवेश करताना दर्शनी भागात लावणार तसेच स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा १११ फूट पुतळा उभारणे, पुनर्विकासात नवी मुंबईकरांची फसवणूक होऊ नये म्हणून वॉर्ड रेसिडेंट प्रोटेक्शन सेल काढणार, मनपा कंत्राटी कामगारांना समान कामाला समान वेतन देणे, बेलापूर वाशी ऐरोली ठाणे कोस्टल रोड उभारणी, आतंरराष्ट्रीय क्रीडा संकुल, राजर्षी शाहू महाराज स्पर्धा परीक्षा केंद्रांची निर्मिती करणे, पर्यावरण व प्रदूषणावर कडक पावले उचलणार, महापालिकेच्या अधिनियमात असलेले प्रभाग सभा संकल्पना राबवून जनतेच्या सहभागातून प्रकल्प विकास कामे राबविण्यासह ब्रास बँड, ढोल ताशा पथकांच्या सरावासाठी स्वतंत्र जागा निर्माण करणार, कुस्तीला प्रोत्साहन देणार, महिला वर्किंग हॉटेलची निर्मिती, नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करणे आदी विविध घोषणा मनसे व शिवसेनेच्या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत. जनतेशी बांधिलकी राखण्याच्या हेतुने प्रकाशित केलेला आमचा हा फक्त जाहीरनामा नसून कर्तव्यनामा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

दरम्यान, सध्या महापालिका निवडणूकीनिमित्त प्रचाराला वेग आला आहे. त्यातच वाशी येथील भाजपा उमेदवारांनी गुजराती भाषेत पत्रके वाटली असल्याचा आरोप यावेळी शिवसेना मनसे नेत्यांकडून करण्यात आला. या प्रकारातून आगरी कोळी समाजाची असलेली नवी मुंबईची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...