Breaking News

वाशीत वकीलाच्या भरधाव कारची वाहनांना धडक

वाशीत वकीलाच्या भरधाव कारची वाहनांना धडक

सुदैवाने जिवितहानी टळली ; चार वाहनांचे नूकसान

वाशी (वार्ताहर) - वाशी रेल्वे स्थानकासमोरील हावरे पंटास्टीया बिजनेस पार्क समोर नियंत्रण सुटलेल्या एका वकीलाच्या भरधाव कारने चारहून अधिक वाहनांना धडक दिल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी कारच्या धडकेमुळे एका खाजगी कारसह इतर वाहनांचे नूकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे.  अपघातावेळी वकीलाच्या कारचालक हा मद्याधुंद अवस्थेत कार चालवित असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. सदर अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या घटनेत वकीलाच्या कारच्या पुढील भागाचे नूकसान झाले आहे. याबद्दल मिळालेली माहिती अशी की, काल दुपारच्या सुमारास वाशी रेल्वे स्थानकासमोरील हावरे फॅटास्टीया बिजनेस पार्क समोरून वकीलाची कार भरधाव वेगात आली. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं कारने रस्त्यालगत असलेल्या एमएच४३ बीपी-४५१२ या खाजगी कारला आधी जोराची धडक दिली. यानंतर या कारची अन्य एका कारला धडक बसली. अशा प्रकारे तीन ते चार वाहनांचे या धडकेत नूकसान झाले. अपघाती घटनेवेळी वकीलाच्या कारचा चालक हा मद्याधुंद अवस्थेत असल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. याप्रकरणी उशीरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...