स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मधील स्वीप” कार्यक्रमांतर्गत विविध विभागांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे कोरे फलक उभारुन मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियान” व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नवी मुंबई महापालिका मुख्यालयात, मतदान हा माझा अधिकार आणि तो मी बजावणार” असा संदेश लिहिलेल्या स्वाक्षरी फलकावर आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी स्वाक्षरी करीत मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ काल केला. यावेळी नवी मुंबईकर मतदारांना १५ जानेवारी रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्र पेट्रेकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनीही फलकावर स्वहस्ताक्षरात स्वाक्षरी करुन मतदान करण्याचा संदेश प्रसारित केला. यावेळी उपस्थित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा निवडणूक विषयक स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ.अजय गडदे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, मालमत्ता कर विभाग उपआयुक्त डॉ.अमोल पालवे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, उद्यान विभाग उपआयुक्त स्मिता काळे, शिक्षण विभाग उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, आणि इतर विभागप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. मी मतदानाचा अधिकार बजावणार - नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती असते, अशा वर्दळीच्या ठिकाणांवर मतदान हा माझा अधिकार आणि तो मी बजावणार” असा संदेश लिहिलेले स्वाक्षरी फलक महापालिकेकडून लावण्यात आले आहेत. नागरिकांनी यावर आपली स्वाक्षरी करुन आपण मतदान करणारच हा निश्चय टृढ करावा आणि इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश द्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
