नवी मुंबई महापालिकेचा ३४ वा वर्धापनदिन... मुख्यालयातील आकर्षक रांगोळीतुन मतदान जनजागृती
नवी मुंबई महापालिकेचा ३४ वा वर्धापनदिन... मुख्यालयातील आकर्षक रांगोळीतुन मतदान जनजागृती
बेलापूर (वार्ताहर) - नवी मुंबई महापालिकेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांना नववर्षाच्या व महापालिका वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त आयकॉनिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका मुख्यालयात वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देणारी भव्यतम व आकर्षक रांगोळी काढण्यात आली असून त्यामध्ये मतदानाचा प्रत्येकाने हक्क बजावावा असा संदेशही देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होत असून, रांगोळी समवेत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे, मुख्य निवडणूक निरीक्षक तथा महाराष्ट्र पेट्रेकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे आणि इतर विभागप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी डाव्या हाताची तर्जनी दाखवित आम्ही मतदान करणार आहोत, आपणही १५ जानेवारीला नक्की मतदान करा असा नागरिकांनी संदेश दिला.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
