Breaking News

नौपाडा भाजी मंडईत दुमदुमला मतदार जनजागृतीचा नारा

नौपाडा भाजी मंडईत दुमदुमला मतदार जनजागृतीचा नारा

ठाणे (30)  - आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५२६ च्या पार्श्वभूमीवर नौपाडाकोपरी प्रभाग समिती अंतर्गत स्वीप (SVEEP) पथकाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. मतदान हा माझा अधिकार असून ते माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव करून देत लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक मतदाराचे मत किती महत्त्वाचे आहे याबाबतची जनजागृती या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी मिताली संचेती यांच्या सहकार्याने शहरातील विविध परिसरात जनजागृती अभियाना राबविण्यात येत आहे.  प्रभाग क्रमांक 19,20,21 व 22 च्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा सावंत यांच्या पुढाकाराने  नौपाडा भाजी मंडई परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.

नौपाडा भाजी मंडईत दररोज मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असल्याने या ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजी विक्रेतेग्राहक तसेच स्थानिक नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

मतदानाच्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी  सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व पात्र नागरिकांनी न चुकता सहभागी व्हावेअसे आवाहन स्वीप पथकाच्या वतीने करण्यात आले.



Most Popular News of this Week