तोंडाला मास्क लाऊन मनसे उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
हवेच्या प्रदूषणाचा प्रतिकात्मक निषेध
नवी मुंबई (प्रतिनिधी) - शुद्ध हवेचा अधिकार हा नवी मुंबईच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. नवी मुंबईतील मोठ्या प्रमाणात होणारे गृहनिर्माण प्रकल्प, ठचउ प्लांट, औद्योगिक कंपन्या यामुळे नवी मुंबईतील हवेच्या प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. याचा प्रतिकात्मक निषेध करत तोंडाला मास्क लावून मनसे राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित देसाई प्रभाग क्र. २२ ड, भूमिका म्हात्रे प्रभाग क्र. २४ क यांचा मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मनसेचे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे,शहर सचिव विलास घोणे,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रोजगारचे संप्रीत तुर्मकर, विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी,अनिकेत पाटील, राज पाटील, प्रवीण शिंदे, शशिकांत गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गद्दार आणि पक्ष बदलूना पाडा आणि कट्टर निष्ठावंतांना निवडून आणा असे आवाहन ही याप्रसंगी गजानन काळे यांनी केले.
Most Popular News of this Week
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
११ जणांच्या मृत्यूनंतर...
कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...
नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...
खारघरमध्ये डेब्रीज खाली...
खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...
